राज्यभरातील अंगणवाडी सेविकांचे, मोबाइल रिचार्ज अनुदान रखडले

औरंगाबाद | राज्यभरातील २ लाखांच्या आसपास संख्येने असलेल्या अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेल्या मोबाइलच्या तीन महिन्यांच्या रिचार्जसाठी मिळणारे ४०० रुपयांचे अनुदान त्यांना सप्टेंबर २०२० पासून प्राप्त झालेले नाही. पदरमोड करून रिचार्जसह तालुकास्तरावर आलेला पोषण आहाराचा मालही वाडी-वस्तीवरील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा लागत आहे. सध्याच्या कोविड-१९ च्या दुसºया टप्प्यात दुर्धर आजार असलेल्या रुग्णांची माहिती संकलित करण्याच्या नव्या कामातही त्यांच्या भर पडली आहे.

राज्यभरात साधारण ९७ हजार २६० अंगणवाडी केंद्रे आहेत. त्यात दोन लाखांवर कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनिसाची संख्या आहे. तालुक्यातील १०० च्या आसपास अंगणवाडी सेविकांचे मोबाइल मंदगतीने काम करत असून त्याच्या दुरुस्तीचाही खर्च त्यांनाच करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याशिवाय मोबाइल रिचार्जसाठी दर तीन महिन्याला ४०० रुपये अनुदान दिले जाते. तेही सप्टेंबर २०२० पासून मिळालेले नाही.

तीन महिन्यांसाठी ४०० रुपये अनुदान…
राज्यभरातील अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेल्या मोबाइलचे रिचार्ज करण्यासाठी तीन महिन्यांसाठी ४०० रुपये एवढेच अनुदान मिळते. हे अनुदान तुटपुंजे आहे. तेही मागील सप्टेंबरपासून मिळालेले नाही. सध्याच्या काळात ८० ते ८५ दिवसांसाठी ६०० रुपये रिचार्जसाठी लागतात. मिळणाºया अनुदानाशिवाय रिचार्जवरील अधिकचा खर्च पदरमोड करावा लागतो.
– शालिनी पगारे, अंगणवाडी सेविका तथा राज्य सदस्य, आयटक.

लेखा परीक्षणाच्या कामांमुळे विलंब…
अंगणवाडी सेविकांना मोबाइलच्या रिचार्जसाठी देण्यात येणारे सप्टेंबरसह या पुढील दोन महिन्यांचेही अनुदान आलेले आहे. मार्चच्या लेखापरीक्षणाच्या कामामुळे त्याचे वितरण झालेले नाही. सप्टेंबरपासूनचे व पुढील दोन महिन्यांचे अनुदान लवकरच वितरित केले जाईल. मोबाइलच्या क्षमतेच्या फारशा तक्रारी नाहीत. ५ ते ७ टक्के मोबाइलमध्ये तांत्रिक काही अडचणी आल्या होत्या.
– प्रसाद मिरकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
महिला व बालविकास विभाग, जि.प. औरंगाबाद

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

 

You might also like