औरंगाबाद – औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयात मोबाईल शुटिंग करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरसह दोघांवर वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यासंदर्भात वेदांतनगर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपींनी सत्र न्यायालय DJ-10 यांच्या कोर्ट कक्षात कामकाज चालू असताना न्यायालयात विनापरवानगी लपून गुप्तपणे मोबाईलमध्ये शुटिंग केली. यामुळे गोपनियतेचा भंग झाला. आज रोजी 14.45 ते 15.30 वाजेदरम्यान जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीत असलेल्या तिसर्या मजल्यावरिल सत्र न्यायालय DJ-10 श्रीमती रामगडीया यांच्या कोर्ट कक्षात हा प्रकार घडला.
याप्रकरणी सफौ राजपाल त्रिंगबकराव जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निखील कल्यानराव काळे (वय 28, व्यवसाय कॉन्ट्रॅक्टर, सिडको, औरंगाबाद), आदित्य गजानन पळसकर (21, सिडको औरंगाबाद) यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपींकडून सॅमसंगचा A -7 व रेडमी नोट 10 प्रो. मॅक्स हे दोन मोबाईल ताब्यात घेण्यात आले आहे. याची एकूण किंमत 45000 रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.