हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटींच्या वसुली प्रकरणावरुन अडचणीत असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 4 कोटी 20 लाख मालमत्तेवर ईडीने जप्ती आणल्यानंतर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी थेट ईडीला च काही सवाल केले आहेत. तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणांचा वापर हा विरोधी पक्षांना अडचणीत आणण्यासाठी व त्रास देण्यासाठी करण्यात येत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केंद्र सरकारवर केला आहे.
अनिल देशमुख यांच्याशी संबंधित कंपनीच्या उरण येथील जमिनीची ईडी चौकशी करत असून सदर जमिनीची किंमत ३०० कोटी रुपये आहे अशा काही माध्यमातून बातम्या आल्या होत्या. ईडीने सदर मालमत्ता जप्त करताना ही जमीन २००५ मध्ये खरेदी केली गेली आणि ₹ २.६७ कोटी किंमतीची आहे असे जाहीर केले आहे. मग या वावड्यांना वेळीच ईडीने उत्तर का दिले नाही?
अंमलबजावणी संचालनालयाने उत्तरे द्यावीत-
1. अजूनही ₹ 300 कोटींच्या मीडियातील वावड्यांची पुष्टी करता का? कारण आता आपल्या म्हणण्याप्रमाणे ही जमीन २००५ मध्ये खरेदी केली गेली आणि ₹ २.६७ कोटी किंमतीची आहे?
२. फ्लॅटची किंमत २००४ मध्ये दिली गेली तर तो या प्रकरणात कसा जोडला जाऊ शकतो? pic.twitter.com/l4r6IwUaa4— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 17, 2021
सचिन वाझे याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याची जबाबदारी दिल्याची माहिती जर तत्कालीन आयुक्त परमबीर सिंह यांना होती, तर त्यांनी तेव्हाच कारवाई न केल्याबद्दल परमबीर यांची चौकशी ईडी कडून का होत नाही?, तसेच ज्या बार मालकांनी वाझेला पैसे दिले आणि ते पैसे वाझेने अनिल देशमुख यांना दिले असं त्यांचं म्हणणं असेल तर त्या बार मालकांवर अजून कारवाई का करण्यात आलेली नाही? असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे.
३. तुम्ही जाहीर केले की डान्स बारच्या मालकांनी वाझे यांच्यामार्फत @anildeshmukh जी यांना ₹ ४.७० कोटी दिले. ते बार मालक अद्याप गजाआड का नाहीत?
४. तथाकथित ₹१०० कोटींच्या मागणीची माहिती असूनही कोणतीही कारवाई न करणाऱ्या परमबीर सिंग यांची चौकशी का केली जात नाही? pic.twitter.com/D5l4QT7idd
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 17, 2021
ईडीनं अद्याप यापैकी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. त्यामुळंच या सर्व कारवाया मोदी सरकारच्या आदेशानं आणि महाविकास आघाडीच्या सरकारला बदनाम करण्यासाठी राजकीय हेतूनं केल्या जात आहेत या आमच्या म्हणण्याला बळ मिळत आहे,’ असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.