अनिल देशमुखांना धक्का!! ईडी कडून ४ कोटी २० लाखांची मालमत्ता जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब नंतर ईडी च्या रडारावर असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचा गंभीर आरोप होता. या अनिल देशमुख यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. अनिल देशमुखांची ४ कोटी २० लाखांची संपत्ती ईडी कडून जप्त करण्यात आली आहे.

अनिल देशमुख यांना आत्तापर्यंत तीन वेळा ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. त्यांच्या दोन्ही स्वीय साहाय्यकांना अटक करण्यात आली असून अनिल देशमुख यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलाला देखील अशाच प्रकारचे चौकशीसाठीचे समन्स बजावण्यात आले आहेत.

१०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप देशमुख यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानं अनिल देशमुखांना एप्रिलमध्ये गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर ईडीनं देशमुख यांच्याशी संबंधित मालमत्तांवर धाडी घातल्या

Leave a Comment