२१ वर्षांपूर्वी एकट्या अनिल कुंबळेने पाकिस्तानच्या संपूर्ण संघाला धाडले होते तंबूत; पहा व्हिडिओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । भारतीय क्रिकेट इतिहासात, अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी एकापेक्षा एक सरस कामगिऱ्या बजवाल्या आहेत. फलंदाजांनी अनेक रेकॉर्डस् आपल्या नावावर नोंदवले आहेत तर गोलंदाजांनीही आपल्या नावावर अनेक विक्रम केले आहेत. परंतु, ७ फेब्रुवारी १९९९ रोजी अनिल कुंबळेने दिल्लीतील फिरोजशाह कोटला (आताचे अरुण जेटली) ) स्टेडियममध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात जो पराक्रम केला तो आजही कोट्यावधी भारतीय क्रिकेट प्रेमींच्या आठवणीत कायम आहे. या सामन्यात अनिल कुंबळेने असा एक कीर्तिमान आपल्या नावावर केला ज्याचा अभिमान आजही प्रत्येक भारतीयाला वाटतो.

21 वर्षांपूर्वी खेळल्या गेलेला हा कसोटी सामना जिंकण्यासाठी पाकिस्तानला ४२० धावांची गरज होती. दरम्यान, पाकिस्तानी सलामीवीर सईद अन्वर आणि शाहिद आफ्रिदी यांनी डावाची सुरुवात करत पहिल्या विकेटसाठी १०१ धावा जोडून हा सामना जिकंण्याचे आपले मनसुबे स्पष्ट केले. परंतु डावाच्या २४.२ षटकांत आलेल्या अनिल कुंबळे नावाच्या वादळात पाकिस्तानचा संपूर्ण संघ नेस्तनाबूत झाला.

या वादळात पाकिस्तानचे त्यावेळेचे तीन मातब्बर फलंदाज (इजाज अहमद, मोहम्मद यूसुफ आणि सकलेन मुश्ताक) यांना खाते उघडण्याची सुद्धा संधी मिळाली नव्हती. पाकिस्तानच्या संघातील सात फलंदाजांना मिळून १० धावांचा आकडादेखील गाठता आला नाही. या सामन्यात अनिल कुंबळेने १० विकेट घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता. या सामन्यात कुंबळेनंतर सर्वाधिक षटके हरभजन सिंगने सर्वाधिक षटके (१८) टाकली होती मात्र, त्याला एकही विकेट घेता अली नव्हती.

केवळ हरभजनच नाही तर भारतीय संघातील अन्य जवागल श्रीनाथ, व्यंकटेश प्रसाद यांना सुद्धा एकही विकेट मिळाली नव्हती. एकट्या कुंबळेने केवळ २०७ धावांवर पाकिस्तानच्या संपूर्ण संघाला तंबूत धाडत या कसोटीत भारताला २१२ धावांनी विजय मिळवून दिला. अनिल कुंबळेच्या या पराक्रमाला आज २१ वर्ष झाले असून आजही त्याची कामगीरी प्रत्येक भारतीयाच्या मनात ताजी आहे.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.