कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
अंकशास्त्र नुसार भविष्य सांगणाऱ्या श्वेता जुमानी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती आता वाद आता रंगला आहे. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी श्वेता जुमानी यांच्या विरोधात कोल्हापूरात आंदोलन केल्यानंतर श्वेता जुमानी यांना संताप अनावर झालाय. जुमानी यांनी अंनिस ने केलेले सर्व आरोप फेटाळले असून उलट अंनिसच्या कोल्हापूरच्या पदाधिकारी सीमा पाटील यांनी आपली बदनामी केली म्हणून १ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याच स्पष्ट केलंय. त्यामुळं भविष्यात श्वेता जुमानी विरुद्ध अंनिस असा वाद रंगणार आहे.
श्वेता जुमानी अंक शास्त्रातील गाढ्या अभ्यासक म्हणून ओळखल्या जातात. केवळ देशभरातीलच नव्हे तरजगभरातील अनेक दिग्गज राजकारणी, सिने अभिनेते, उदयोजक जुमानी यांच्याकडे येतात. श्वेता जुमानी या अंकशास्त्रनुसार भविष्य सांगतात आणि लोकांची फसवणूक करतात असा दावा अंनिस ने केला आहे. जुमानी या आठवड्यात कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत म्हटल्यावर कोल्हापूरच्या अंनिसच्या पदाधिकारी सीमा पाटील यांनी थेट जुमानी रहात असलेल्या हॉटेलवर मोर्चा काढत आंदोलन केले.पुरोगामी कोल्हापुरातून श्वेता जुमानी चले जाव, आकड्याचा खेळ बंद कराच्या जोरदार घोषणा करत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे. जुमानी रहात असलेल्या हॉटेलच्या समोर अंनिस ने जवळपास अर्धा तास हातात लक्षवेधी पोस्टर घेऊन जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांची आंदोलन केलं.
श्वेता जुमानी या हॉटेलमध्ये पहिल्या मजल्यावर ती एका रूम मधून हे सर्व आंदोलन पहात होत्या. जुमानी यांनी आंदोलकांनावर येण्याची विनंती केली होती परंतु हे आंदोलक मला भेटण्यासाठी आले नसून फक्त माझी बदनामी करण्यासाठी हे आंदोलन करत असल्याची प्रत्युत्तर त्यांनी दिलंय. तसेच माझी बदनामी केल्या या प्रकरणी अनिसच्या पदाधिकारी सीमा पाटील यांच्याविरोधात एक कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
कोल्हापूर हे पुरोगामी विचारांचा शहर आहे. त्यामुळे कोल्हापुरात अशी भोंदूगिरी चालणार नसल्याच सांगत अंनिस ने संख्याशास्त्र अभ्यासात श्वेता जुमानी यांना टार्गेट केला आहे तर श्वेता जुमानी यांनी मी कुणाला फसवलं असेल तर त्यांनी पोलिसात जाऊन माझ्या विरोधात तक्रार करावी अस थेट आव्हान अंनिस ला दिल आहे. त्यामुळे पोलिसांच्या बंदोबस्तात भविष्यात कोल्हापुरात आणि विरुद्ध श्वेता जुमानी विरुद्ध आणि असं वाद रंगणार आहे.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.