कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पाटण येथील कोयना नदीवरील पाटण वरून मोरगिरी परिसराला जोडणारा जलसेतू याच्या खालील बाजूस कोयना नदीत जंगलातून पाण्याच्या शोधात आलेला गवारेडा शनिवारी सकाळी मूर्त अवस्थेत दिसून आला आहे. त्यामुळे नेरळे पुलावरून ये-जा करणाऱ्यांची पुलावर शनिवारी सकाळी चांगलीच गर्दी जमली होती. तसेच जंगलातील पाणीसाठा संपल्याने प्राण्यांनाही कडक उन्हामुळे पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या कडक उन्हाचे दिवस असल्याने कोयना नदीला पाणी मुबलक प्रमाणात आहे. मात्र परिसरात भरपूर प्रमाणात जंगल असून येथे वन्यप्राणी आढळून येत असतात. गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हाळा पडल्याने जंगलातील पाणीसाठा संपलेले आहेत. यामुळे जंगलातुन बाहेर आलेला गवरेडा हा पाण्याच्या शोधात आल्याचा अंदाज आहे. गवारेडा कोयना नदीच्या काठाला असलेल्या ऊसाच्या शेतात आदल्या रात्रीत असण्याची शक्यता आहे.
परंतु नदीच्या बाजूला दरड असल्याने नदीत पाण्यासाठी जाताना अंदाज न आल्याने पडल्याने हा गवरेडा पाण्यात वाहत गेल्याने ठार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शनिवारी सकाळी कोयना नदीवरुन ये-जा करणाऱ्या लोकांना नदीच्या पात्रात काय तरी पाण्यावर तरंगत आहे, असे दिसले. त्यानंतर तो गवरेडा आहे अशी खात्री झाली. त्यातील काही लोकांनी वनविभागाशी संपर्क साधला. सदरच्या घटनेची माहिती मिळताच पाटण वनविभागाचे अधिकारी व पशुवैधकीय यांनी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी परिसरात माहिती मिळताच लोकांनी गवरेडा पाहण्यासाठी गर्दी केली होती.
उन्हाचा जंगलातील प्राण्याणाही फटका
कोयना धरण परिसरात तसेच पाटण तालुक्यात जंगल परिसर मोठा असून येथे वन्यप्राणी आढळतात.मात्र जंगल परिसरात सतत होणारी वृक्षतोड आणि कडक उन्हाळा यामुळे पाणीसाठे संपुष्टात आले आहेत. त्यामुळेच पाण्याच्या शोधात असणाऱ्या या गवारेड्याचा मृत्यू झाला असावा.