नवी दिल्ली : हरिद्वार येथे सालाबाद प्रमाणे कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. मात्र देशभरात कोरोनाची वाढणारी रुग्णसंख्या तसेच हरिद्वार येथेही वाढणारी कोरोनाची रुग्ण संख्या पाहता आता कुंभ समाप्तीची चर्चा सुरू होती. या चर्चे दरम्यान गुरुवारी निरंजनी आखाडाने समाप्तीची घोषणा केली आहे.
याबाबत बोलताना आखाड्याचे सचिव महंत रवींद्र पुरी यांनी कुंभ समाप्तीची घोषणा केली, ते म्हणाले कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता आखड्याने असा निर्णय घेतला आहे की, 17 एप्रिल ला कुंभमेळा समाप्त केला जाईल. पुरी यांनी इतर आखाड्यांनाही मेळा समाप्त करण्याचे आवाहन केले. पुरी म्हणाले, करोना स्थिती पाहता लोकांच्या हितासाठी मेळा समाप्तीची घोषणा करणं गरजेचं आहे.
साधुसंतांचा सामान्य भाविकांना ही कोरोना ची लागण होत आहे. यामुळे कुंभमेळा ठरलेल्या वेळेच्या आधीच समाप्त करण्याचा निर्णय आखाडाने घेतला आहे असही ते म्हणाले. इतर आखाडे देखील त्यांच्या आखाड्याच्या या निर्णया सोबत सहमत आहेत. महंत रविंद्रपुरी यांच्या म्हणण्यानुसार 27 एप्रिलला महाकुंभात शाही स्नान आहे. या महाकुंभ अंतिम शाहीस्नान असेल त्यामुळे महाकुंभ ची परंपरा सुरूच राहील. मात्र या दिवशी बहुतेक संत हे सांकेतिक स्नानच करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. रविंद्रपुरी यांनी सांगितले की, त्यांनी आखाड्याच्या छावणीमध्ये उपस्थित सर्व संतांना लवकरात लवकर आपल्या मंदिरांमध्ये आणि मठांमध्ये परत जाण्यास सांगितलं आहे. जेणेकरून कोरोनाच्या प्रसाराचा धोका कमी होईल.
दरम्यान या आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनाही 11 एप्रिल ला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्याशिवाय इतर आखाड्याचे संतही पॉझिटिव्ह आढळले आहेत. महाकुंभमेळा सोबत जोडल्या गेलेल्या सीएम अर्जुन सिंह सेंगर यांच्या म्हणण्यानुसार आखाड्यात जास्त जणांच्या कोरोना चाचणी केल्या गेल्या नाहीत त्यामुळे बाधितांच्या एकूण संख्येचा अंदाज लावणं शक्य नाही.
या आधी निर्वाणी आखाड्याचे संत कपिल देव यांचा गुरुवारी मृत्यू झाला आहे. कपिलदेव यांना कोरोनाची लागण झाली होती. आणि देहरादूनच्या कैलास रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page