गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक; आठ नक्षलवाद्यांचा खात्मा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीत पुन्हा एकदा पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. लसी-60 पोलीस पथकाला 13 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आल्याची प्राथमिक माहिती आहे. पहाटे कोम्बिंग ऑपरेशनवर निघालेल्या पोलीस पथकावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला होता. प्रत्युत्तरादाखल पोलीस विभागाकडून दोन तासापासून चकमक सुरु आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील कोटमी जंगल परिसरातील छत्तीसगड सीमावर्ती भागात सदर चकमक सुरू आहे. कोटरी जंगल परिसरात नक्षलवादी आणि मोठी सभा घेतल्याची गुप्त माहिती पोलीस विभागाला मिळाली होती.या माहितीद्वारे आज पहाटे सी.६० पोलिस पथकाने ऑपरेशन सुरू केल होते.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment