RBI कडून आणखी एका सहकारी बँकेचे लायसन्स रद्द !!!

RBI
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI कडून आणखी एका सहकारी बँकेला मोठा धक्का देण्यात आला आहे. RBI ने महाराष्ट्रातील लक्ष्मी सहकारी बँक लिमिटेडचे लायसन्स रद्द केले आहे. याबरोबरच आपल्या खातेदारांना 5 लाखांपर्यंतची रक्कमही परत करावी, असेही म्हटले आहे.

RBI च्या आदेशानंतर आता लक्ष्मी सहकारी बँकेला कोणतीही आर्थिक कामे करता येणार नाहीत. RBI ने एक निवेदन जारी करत सांगितले गेले की,”प्रत्येक ठेवीदाराला डीआयसीजीसी कायदा, 1961 च्या तरतुदींनुसार डिपॉझिट्स इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून 5 लाख रुपयांपर्यंतचा क्लेम मिळवण्याचा अधिकार असेल.”

Laxmi Co-operative Bank Ltd. in the city Solapur

लायसन्स का रद्द केले गेले ???

हे लक्षात घ्या कि, बँकेकडे पुरेसे भांडवल नसल्यामुळे आरबीआय कडून लक्ष्मी सहकारी बँकेचे लायसन्स रद्द करण्यात आले. “लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नसल्यामुळे लायसन्स रद्द करण्यात आले आहे,” असे मध्यवर्ती बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले गेले आहे.

Maharashtra's Laxmi Co-operative Bank's licence cancelled, depositors can claim up to Rs 5 lakh | Personal Finance News | Zee News

नागरिकांच्या पैशांचे काय होणार ???

DICGC कडून इन्शुरन्स योजनेअंतर्गत, बँकांमध्ये जमा असलेल्या पैशांचा 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा उतरवला जातो. यामुळे,जर एखादी बँक दिवाळखोर झाली किंवा तिचे लायसन्स रद्द झाले तर ग्राहकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे पैसे परत मिळतात. हे लक्षात घ्या कि, DICGC ही भारतीय रिझर्व्ह बँकेची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे, जिच्याकडून 5 लाख रुपयांपर्यंतच्या बँकेच्या डिपॉझिट्सवर विमा संरक्षण दिले जाते.

RBI cancels licence of Laxmi Co-operative Bank, depositors can claim up to Rs 5 lakh - Business News

110 वर्षे ही जुनी बँक आजपासून बंद

पुण्यातील रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेला आजपासून टाळे ठोकण्यात येणार आहे. ज्यामुळे आता बँकेच्या सर्व सेवाही बंद केल्या जाणार आहेत. RBI च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन न केल्यामुळे गेल्या महिन्यातच या बँकेचे लायसन्स रद्द करण्यात आले होते. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची शक्यता नसल्याचे मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.rbi.org.in/

हे पण वाचा :

FD Rates : ‘या’ 2 बँकांमधील ज्येष्ठ नागरिकांसाठीची एफडी योजना 1 ऑक्टोबरपासून बंद होणार*

T20 World Cup 2022 मधील टॉप 8 संघांच्या कर्णधारांच्या संपत्तीविषयी जाणून घ्या

Share Market मध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण, FMCG-ऑटो सेक्टरमध्ये वाढ

Rupee Co-operative Bank ला आजपासून ठोकले जाणार टाळे

Bank FD : आता ‘या’ बँकेकडून FD वर मिळणार 7.70 टक्के व्याज, व्याज दर तपासा