‘बाहुबली’ फेम अनुष्का शेट्टी क्रिकेटरच्या प्रेमात; करणार लवकरच लग्न?

0
44
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘बाहुबली’ या ब्लॉकबस्टर चित्रपट मालिकेमध्ये देवसेना हे पात्र साकारणारी अभिनेत्री अनुष्का शेट्टी केवळ दक्षिणेतच नाही तर संपूर्ण भारतात लोकप्रिय झाली. या चित्रपटाबरोबरच अनुष्काच्या खासगी आयुष्याबद्दलही बऱ्याच चर्चा रंगल्या. ‘बाहुबली’मध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेता प्रभास आणि अनुष्का ही जोडी एकमेकांना डेट करत असल्याच्या अनेक बातम्या बाहेर आल्या. मात्र या दोघांनीही या चर्चा अफवा असल्याचं म्हणत आम्ही दोघे रिलेशनशिपमध्ये नसल्याचं सांगितलं आता अनुष्काच्या लग्नाविषयीची चर्चा जोरदार रंगली असून ती एका क्रिकेटरशी लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा क्रिकेटर उत्तर भारतातला असल्याचं कळतंय. एकीकडे अनुष्का तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून दुसरीकडे तिच्या लग्नाचीही तयारी सुरु असल्याचं समजतंय. मात्र अद्यापही अनुष्काने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती प्रसार माध्यमांना दिलेली नाही. हा क्रिकेटर नेमका कोण असेल याबाबत मात्र बरेच तर्क तिच्या चाहत्यांद्वारे लावले जात आहेत.

अनुष्का आणि प्रभासच्या लग्नाविषयीच्या चर्चांना फारच रंगविण्यात आलं होतं. या दोघांनी आपल्या लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम दिल्या नंतर प्रभासचं नाव दुसऱ्या अभिनेत्रीशी जोडलं गेलं आणि आता अनुष्काच्या लग्नाविषयीच्या या चर्चा कितपत खऱ्या आहेत हे फक्त तिच सांगू शकेल. तिच्या आगामी चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास,येणाऱ्या एप्रिल महिन्यात ‘नि:शब्दम’ हा तिचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आर. माधवन हा दाक्षिणात्य अभिनेता प्रमुख भुमिकेत दिसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here