कराडच्या कोयना पुलावर ॲपे रिक्षा – दुचाकीची धडक; 2 दुचाकीस्वार गंभीर जखमी

Karad Koyna bridge accident news
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड येथील कोयना पुलावर गुरुवारी दुपारी एका ॲपे रिक्षा व दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कराड येथे असणाऱ्या कोयना पुलावर गुरुवारी दुपारी वाहतूक सुरु होती. यावेळी ॲपे रिक्षा (क्रमांक MH 11 AG 7869) व दुचाकी (क्रमांक RR 09 DT 0263) मध्ये अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दिनकर रामचंद्र सूर्यवंशी व भाऊ काशिनाथ सूर्यवंशी (रा. पाटण, जी. सातारा) दोघेजण गंभीर जखमी झाले. या अपघातात दुचाकी व ॲपे रिक्षाचे नुकसान झाले आहे.

या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे दस्तगीर आगा, विजय पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. दरम्यान या अपघातामुळे पुलावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. महामार्गावर विस्कळीत झालेली वाहतूक दस्तगीर आगा विजय पाटील व कर्मचाऱ्यांनी सुरळीत केली.