हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Skoda ऑटो इंडियाच्या कार्सचा टिकाऊपणा आणि सुरक्षिततेच्या बाबतीत रेटिंगमध्ये सतत वाढ होत आहे. कारण अलीकडेच स्लाव्हिया सेडानला ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्रॅम (ग्लोबल NCAP) या क्रॅश टेस्ट्समध्ये 5 पैकी 5-स्टार्स मिळाले आहेत. यानंतर आता स्लाव्हिया देखील ही ग्लोबल NCAP द्वारे टेस्टिंग केलेली सर्वात सुरक्षित कार बनली आहे. आता ही कार भारतातील सर्वात सुरक्षित कारपैकी एक ठरली आहे. हे लक्षात घ्या कि, यानंतर आता स्कोडा ऑटो इंडिया ही भारतातील एकमेव अशी कार निर्माता बनली आहे, ज्यांच्याकडे प्रौढ आणि लहान प्रवाशांसाठी क्रॅश-टेस्ट्समध्ये 5-स्टार्स मिळवलेल्या कारचा ताफा आहे.
याबाबत माहिती देताना Skoda ऑटो इंडियाचे ब्रँड डायरेक्टर श्री. पेट्र सॉल्क यांनी सांगितले कि, “स्कोडाने ग्राहकांच्या सुरक्षिततेशी कधीही तडजोड न करण्याची रणनीती आखली आहे. तसेच आता मला हे सांगताना आनंद होतो आहे की, आमची दुसरी इंडिया 2.0 कार स्लाव्हियाला ग्लोबल NCAP सुरक्षा चाचणीमध्ये 5-स्टार रेटिंग मिळाले आहे. हे सुरक्षितता, कुटुंब आणि मानवी स्पर्श या आमच्या ब्रँड मूल्यांना पूर्णपणे संरेखित करते .
कारला बाहुबली बनवण्याचा प्रयत्न
पेट्र सॉल्क म्हणाले कि,” आम्ही स्कोडाची उत्पादनांवर विश्वास दाखवणाऱ्या ग्राहकांचे मनापासून कौतुक करतो. आता आम्हांलाही त्यांना बाजारातील सर्वात सुरक्षित कार देता येऊ शकत असल्याने आनंदच झाला आहे. आता आमच्याकडे सुरक्षिततेच्या सर्व चाचणी पूर्ण केलेल्या कारच्या श्रेणी आहेत. याद्वारे आम्ही आमच्या गाड्यांची गुणवत्ता, टिकाऊपणा आणि सुरक्षितता यावर नेहमीच लक्ष केंद्रित करतो आहोत.” Skoda
ते पुढे म्हणाले कि,” ग्राहकांची सुरक्षितता हा नेहमीच आमच्या रणनीतीचा केंद्रबिंदू राहिला आहे आणि या तत्त्वज्ञानावरच आम्ही कार तयार करत राहू. तसेच, सुरक्षिततेमध्ये कसलीही तडजोड न करता स्कोडाचे डायनॅमिक ड्रायव्हिंग फीचर्सही कायम ठेवण्यात आले आहेत. त्याच्या विविध अंतर्गत आघातांवर चाचणी घेण्यात आली आहे. स्लाव्हियाचे डिझाईन सुरुवातीपासूनच ग्राहकांची सुरक्षितता लक्षात ठेवूनच तयार केले गेले होते. त्याचे इंटरनल डिझाईन कमी वेल्डेड आहे. तसेच याच्या संरचनेत मजबूत स्टील वापरण्यात आले आहेत. जे क्रॅशचा प्रभाव कमी करण्यासाठी तयार केले गेले आहेत. Skoda
असे असतील फीचर्स
या स्लाव्हियामध्ये 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, मल्टी-कोलिजन ब्रेकिंग, ट्रॅक्शन कंट्रोल, अँटी-लॉक ब्रेक्स, चाइल्ड सीटसाठी ISOFIX माउंट्स, टॉप टिथर अँकर पॉइंट्स, रेन-सेन्सिंग वायपर, ऑटोमॅटिक हेडलाइट्स, टायर-प्रेशर मॉनिटरिंग या गोष्टी देण्यात आल्या आहेत. Skoda
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.skoda-auto.co.in/models/slavia/slavia
हे पण वाचा :
सलग 6 धक्क्यांनंतर RBI कडून मिळाला दिलासा, सध्यातरी वाढणार नाही ग्राहकांचा EMI
Share Market मध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण, सेन्सेक्स 344 अंकांनी तर निफ्टी 71.15 अंकांनी खाली
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Multibagger Stock : फार्मा क्षेत्रातील ‘या’ दिग्गज कंपनीने गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये
आता First Republic Bank लाही लागणार टाळे, आठवड्याभरात अमेरिकेतील तिसरी बँक दिवाळखोर