हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन APMC Market Navi Mumbai । नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) मार्केटच्या स्थलांतरणाबाबत सध्या चर्चा सुरू आहे. राज्यातील सर्वाधिक मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून या APMC मार्केट कडे बघितलं जाते. 1977 मध्ये स्थापन झालेलं APMC मार्केट सुरुवातीला मुंबईत होते. त्यानंतर ते नवी मुंबईतील वाशी येथे हलवण्यात आले. आता नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अन्य ठिकाणी स्थलांतरित होणार असल्याच्या चर्चा आहेत. यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील समाविष्ट असणाऱ्या 14 गावांची जमीन सुचवण्यात आली आहे.
मुंबई मधून 80 ते 90 च्या दशकत नवी मुंबईमध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC Market Navi Mumbai) पाचही बाजारपेठा स्थलांतरीत करण्यात आल्या. यासाठी माथाडी आणि व्यापारी साठी एक लाख हुन जास्त घरे शासनाने कमी किंमती मध्ये उपलब्ध करून दिली. परंतु आता पुन्हा एकदा नवी मुंबईतून एपीएमसी मार्केट हद्दपार होण्याची चिन्हे आहेत, या संदर्भात नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी एपीएमसीच्या सचिवांसोबत बैठक घेतली. नव्या बाजारात समितीसाठी शासनाने 100 एकर भूखंड शोधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच महानगरपालिकेच्या हद्दीतील 14 गावांची जमीन पर्याय म्हणून सुचवली आहे. विमानतळ जवळील उलवा आणि पालघर मधील जागा या नव्या एपीएमसीसाठी तपासल्या जात आहेत.
व्यापारी आणि माथाडी कामगारांचा विरोध– APMC Market Navi Mumbai
सध्याचे एपीएमसी मार्केट नवी मुंबई शहराच्या मध्यभागी असल्याने या जमिनीवर सहविकास करण्याचा प्रस्ताव आहे. नवी मुंबई महानगर पालिकेने बाजार समिती प्रशासनाला सुचवलेल्या जागेबाबत व्यापारी आणि इतर घटकांचा आढावा घेण्यास सांगितले आहे. परंतु एपीएमसी मधील व्यापाऱ्यांनी आणि माथाडी कामगारांनी मात्र या स्थलांतरणाला तीव्र विरोध केला आहे. बाजार समितीचे अनेक व्यापारी आणि पदाधिकारी यांनी स्पष्ट केलं की, जर एपीएमसीला दुसऱ्या ठिकाणी हलवलं गेलं. तर त्याचा फटका संपूर्ण पुरवठसाखळीला बसू शकतो सध्या मुंबईसह उपनगरातील भाजीपाला, फळं, कांदे-बटाटे, धान्य यांचं वितरण नवी मुंबई एपीएमसीतून होते. त्यामुळे एपीएमसी हे राज्यभरातील शेती माल व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठीचं मोठं सेंटर आहे.




