अप्पासाहेब देशमुखांना मनी लाॅंड्रिंग प्रकरणात ईडीची कोठडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | मायणी येथील श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त अप्पासाहेब देशमुख यांना ईडीने शुक्रवारी (दि.17 जून) अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना 24 जूनपर्यंत ईडीची कोठडी ठोठावली आहे. अप्पासाहेब देशमुख यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात 9 मे रोजी आप्पासाहेब देशमुख यांचे बंधू श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष महादेव देशमुख यांनाही अटक केली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणात दोन्ही सख्ख्या भावांना अटक केल्याने माण तालुक्यात या खळबळ उडाली आहे. ईडीकडून अटक प्रकरणात आ. जयकुमार गोरे यांच्यावरही देशमुख यांनी आरोप केले होते. या संस्थेच्या ईडी धाडीमुळे शिक्षण क्षेत्रात तसेच राजकीय क्षेत्रातील वातावरण तापले होते.

या प्रकरणात श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष महादेव देशमुख आणि इतर आरोपींविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीएमएलए म्हणजे मनी लाँड्रिंग प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Leave a Comment