हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । दिल्ली नोएडा आणि फरीदाबाद येथील नागरिकांना सतत ट्राफिक जामचा त्रास सहन करावा लागतो. परंतु आता इथल्या नागरिकांसाठी खुशखबर आहे. त्यांना आता डीएनडीमधून जाताना या ट्राफिकचा सामना करावा लागणार नाही. कारण हा मार्ग आता नोएडा- फरीदाबाद ते दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे (Delhi Mumbai Expressway) सोबत कनेक्ट होणार आहे.
डीएनडी हा एक फ्लायवे आहे. दिल्ली नोएडा डायरेक्ट असा याचा फुल्ल फॉर्म आहे. हा भारतातील पहिला 8 लेन असलेला रुंद द्रुतगती मार्ग आहे. तो एकूण 9.2 किमी लांबीचा आहे, आता नोएडा- फरीदाबाद ते दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे वर जाणाऱ्यांना थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. कारण आता दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे ला DND शी जोडण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. त्याचबरोबर सरकारने 4,509 चौरस मीटर जमीन NHAI ला दिली आहे.
या एक्स्प्रेस वे सोबतच डीएनडी 3भागात जोडला जाणार आहे. यातील पहिल्या भागात महाराणी बागेतील डीएनडी ते जैतपूर पुष्टा रोड जंक्शन, दुसऱ्या भागात जैतपूर पुष्टा ते फरीदाबाद-बल्लभगड बायपास आणि तिसऱ्या भागात फरिदाबाद-बल्लभगड बायपास ते केएमपी एक्स्प्रेस वेच्या जंक्शनपर्यंतचा रस्ता जोडला जाणार आहे. हा 1,300 किमी पेक्षा जास्त लांबीचा एक्सप्रेस वे देशातील सर्वात मोठा एक्सप्रेस वे मानला जात असून केंद्र सरकारच्या भारतमाला या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा एक भाग आहे. हा महामार्ग बनवल्यानंतर दिल्ली-मुंबई प्रवासासाठी लागणारा वेळ कमी होईल.
हा एक्सप्रेस वे डीएनडीशी जोडल्या नंतर दिल्ली ते फरिदाबाद आणि नोएडा याठिकाणी होणाऱ्या जामच्या स्थगिती पासून लोकांना दिलासा मिळेल. परंतु त्यांनी एक अट टाकली आहे. एनएचएआय दिल्लीत जमा झालेला कचरा आणि डेब्रिजचा वापर महामार्ग आणि इतर रस्त्यांच्या बांधकामासाठी करेल. आणि एनएचएआयला मिळालेल्या जमिनीचे पैसेही द्यावे लागणार आहेत.