हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या दगदगीच्या आणि धावपळीच्या जीवनात अनेकांना बीपी म्हणजे ब्लड प्रेशरचा त्रास उद्भवतो. भारत तर अनेक जणांना हा त्रास आहे. ब्लड प्रेशरकडे आपण दुर्लक्ष केलं तर आपल्याला हृदयविकार, ब्रेन स्ट्रोक अशा गंभीर समस्यांना सामोरे जाऊ लागते. त्यामुळे वेळीच यावर उपाय कारण कधीही चांगलं. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला तर घेतलाच पाहिजे पण त्याचप्रमाणे, आम्ही तुम्हाला अशाच काही घरगुती उपायांबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमचा बीपी नियंत्रित करू शकता.
योग्य आहार घ्या-
जर तुम्हाला बीपीची समस्या असेल तर तुमच्या आहारात जंक फूड, तेलकट पदार्थ, मैद्याचे आणि चरबीचे पदार्थ खाणे शक्यतो टाळा. त्याऐवजी हिरव्या पालेभाज्या, फळे, केळी, मनुका, फळभाज्या यांचा समावेश आपल्या आहारात करा.
वजन आटोक्यात ठेवा-
वजन जास्त असेल तर बीपी वाढण्याचा धोका असतो, म्हणून आपले वजन नियंत्रणात ठेवा. यासाठी देखील योग्य आहार आणि नियमितपणे व्यायाम करणं गरजेचं आहे.
पुरेसे पाणी प्या-
दररोज कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी नक्की प्या, यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीतपणे पार पडतो. आणि रक्तातील अशुद्धी निघून जाते त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्यावे.
मिठाचा वापर कमी करा-
हाय बीपीचा त्रास असलेल्या लोकांनी मिठाचा वापर कमी करावा, आपल्या आहारात जास्तीचे मीठ शक्यतो खाऊ नये.
हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी कारल्याच्या शेंगा आणि तुरीच्या शेंगा अत्यंत फायदेशीर आहेत तसेच पालक आणि गाजराचा रस एकत्र करून एक ग्लास रस सकाळ संध्याकाळ पिल्याने बीपी नियंत्रणात राहतो.