अहेरी वनपरिक्षेत्रातील बोरीच्या जंगलात लाखो रुपयांच्या सागवानाची चोरी

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गडचिरोली प्रतिनिधी | रितेश वासनिक

आलापल्ली वनविभागाअंतर्गत असलेल्या अहेरी वनपरिक्षेत्रातील बोरीच्या जंगलात लाखो रुपयांचे सागवान वृक्ष चोरीला गेले असल्याचे समोर आले आहे. तस्करांनी सागवानाचे वृक्ष अवैधरित्या कापून नेले असून यात वनविभागाला अंदाजे १० लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे बोलले जात आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, आलापल्ली वनविभागाच्या अहेरी वनपरिक्षेत्रातील बोरी नियतक्षेत्र, लगाम, येल्ला या नियत क्षेत्रात कम्पार्टमेंट ५८९, ५९०, ५९१ आणि ५९२ मध्ये १०० हून अधिक साग आणि इतर वृक्ष यांची तस्करांनी सर्रास कत्तल करुन प्राणहिता नदिमार्गे तेलंगणा, आध्रा मार्गे या राज्यात नेऊन चोरटी विक्री केली असून मागील काही महिण्यांपासून सदर गोरखधंदा सुरु असून वनप्रशासन मात्र मुग गिळून चुप बसले होते.

संपुर्ण भारतात उच्च प्रतिच्या सागवानासाठी आलापल्ली जंगल सुप्रसिद्ध आहे. बोरीच्या वनपालाने सर्वप्रथम चार दिवस चार पंचनामे करुन वनविभागाकडे पाठविल्याने उपविभागीय वनअधिकारी यांनी सदर विटाचे अवलोकन करण्याचे आदेश दिले आहेत.