विशेष प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीवेळी पुलवामा हल्ल्याचा वापर करून सत्ता मिळवण्यात भाजपला यश मिळालं खरं. न भूतो न भविष्यती अशा प्रकारे कामगिरी करत भाजपने ३५० जागा काबीज केल्या. परंतु २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपची ही डाळ शिजली नाही. राज्यात नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांनी जवळपास ७० हुन अधिक सभा घेत काश्मीरचा प्रश्न मांडण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
याउलट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने स्थानिक मुद्यांना प्राधान्य देत ही निवडणूक लढवली. याचाच फायदा त्यांना झाला असून एक्सिट पोलने वर्तवलेले अंदाज मोडीत काढत महाराष्ट्राची निवडणूक महाराष्ट्राच्या प्रश्नांभोवतीच लढली गेली हे या निकालांनी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रातील जनतेनेही काश्मीरच्या बाबतीत ३७० हटवण्याचा निर्णय घेतला ते चांगलंच केलं पण त्याचा महाराष्ट्रमध्ये फायदा नाही असं मत व्यक्त केलं होतं. एकूणच काय कलम ३७० च्या वापरामुळे राज्यात भाजप शहीद झाल्याचं पहायला मिळत आहे.