लहानपणापासून मी मुंबईचा चाहता ; मुंबईच्या ताफ्यात आल्यानंतर अर्जुन तेंडुलकरची पहिली प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2021 साठी काल बोली लागली असून सचिन तेंडुलकरचा पुत्र अर्जुन तेंडुलकर याला मुंबईच्याच संघाने 20 लाख या बेस प्राईझ वर खरेदी केले.

लिलावाच्या पहिल्या फेरीत अर्जुन तेंडुलकरवर एकाही संघाने बोली लावली नाही. पण, लिलावाच्या अखेरच्या फेरीत मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला खरेदी केलं. मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला त्याच्या मूळ किंमतीत म्हणजेच 20 लाख रुपयांना खरेदी केलं. पहिल्यांदाच आयपीएलमध्ये संधी मिळाल्याने आणि मुंबईसारख्या तगड्या संघाने खरेदी केल्यानंतर अर्जुन तेंडुलकरही चांगलाच आनंदात आहे.

लिलावानंतर मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन अर्जुनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. “मी लहानपणापासून मुंबई इंडियन्सचा खूप मोठा चाहता राहिलोय….माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि संघ मालकांचे आभार मानतो. मुंबई पलटनमध्ये सहभागी होण्यास मी खूपच उत्सुक आहे आणि ब्लू गोल्ड जर्सी घालण्याची आतुरतेने वाट बघतोय”, अशी प्रतिक्रिया अर्जुनने दिली आहे.

अर्जुन तेंडुलकर उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. तर वेळप्रसंगी विस्फोटक फलंदाजी करु शकतो. अर्जुन तेंडूलकर तळाला संघासाठी मोठे फटके मारु शकतो. अर्जुनने नुकत्याच झालेल्या पोलीस आमंत्रण शिल्ड क्रिकेट स्पर्धेत अष्टपैलू क्षमतेची चुणूक दाखवून दिली होती. अर्जुनने एकाच षटकात ५ षटकार लगावत ३१ चेंडूत ७७ केल्या. तसेच तीन महत्वाचे बळीही मिळवले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment