आमच्या धमण्यांमध्ये – रक्तामध्ये शिवराय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित भव्य कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी आमच्या धमण्यांमध्ये – रक्तामध्ये शिवराय आहेत अस उदगार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. राजकारण बाजुला पण आमच्या सगळ्यांच्या मनात शिवप्रेम आहे अस उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवरायांच्या पुढे नतमस्तक व्हायला शिवजयंतीच पाहीजे असं नाही. छत्रपतीनी लढा दिला तो आता सांगण्याची गरज नाही, सगळ्यांना ठाऊक आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत कायम राहणार असही  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.कोणतंही पवित्र काम करताना शिवाजी महाराज आठवतात. कारण शिवाजी महाराज आपल्या धमण्यात आणि रक्तात आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, छत्रपती दैवत का आहे. तर लढण्यासाठी तलवार पकडण्याची जिगर त्यांच्यात होती.कोरोनाशी लढतांना ही प्रेरणा व जिद्द आम्हाला मिळते आहे. पण आता कोरोनासारखा दुश्मन आहे. त्यावर आपल्याला मात करायची आहे, असं सांगतानाच साप तसे अजूनही आहे. काही साप चावतात. तर काही चावत नाहीत. त्यांना ठेचायचं असतं, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर नाव न घेता टीका केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’