लडाख दौऱ्यात लष्करप्रमुखांनी जखमी जवानांची विचारपूस करत वाढवलं मनोबल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लेह । सीमा वादावरून भारत आणि चीनमध्ये तणाव कायम आहे. लडाख सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. चीनशी झालेल्या तणावाच्या परिस्थितीत लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे लेह येथे पोहोचले. त्यांनी एकूण परिस्थितीची माहिती घेतली. याव्यतिरिक्त, त्यांनी लेहच्या सैन्य रुग्णालयात भेट दिली आणि गलवान खोऱ्यातील संघर्षांतील जखमी सैनिकांची विचारपूस केली. लष्करप्रमुखांचा हा दौरा दोन दिवसांचा असणार आहे.

लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये हिंसक झडप झाल्यानंतर लष्करप्रमुख पहिल्यांदा लेह दौऱ्यावर आले आहेत. याआधी वायुसेना प्रमुख एयर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांनी रविवारी लडाखचा दौरा केला होता. लडाख सीमेवर चीनसोबत झालेल्या हिंसक झडपमध्ये २० भारतीय जवान शहीद झाले होते. तर बरेच जण जखमी. दरम्यान, गलवान खोऱ्यातील संघर्षात चीनचेही 40-50 सैनिक मारले गेले होते. पण चीनने याबाबत कोणताही खुलासा केला नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार पेंगोंग तलाव आता भारत आणि चीनमधील वादाचा मुख्य मुद्दा बनत चालला आहे. चीनच्या फिंगर 4 येथे सुरु असलेल्या बांधकामावर भारतीय सैन्याचा सर्वाधिक आक्षेप आहे. 5 मे रोजी पेंगाँग तलाव येथे भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये पहिली झटापट झाला. भारत तणाव कमी करण्याच्या बाजुने आहे. सोमवारी मोल्डोमध्ये भारत आणि चीन यांच्यात बैठक झाली. दोन्ही देशांमध्ये मागे हटण्याबाबत सहमती झाली असल्याचे सांगितलं जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment