भारतीय लष्करात कोरोनाचा शिरकाव, लडाख येथील जवानाला कोरोनाची लागन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | जगभर कोरोना व्हायरसने थेैमान घातले आहे. भारतात आत्तापर्यंत १३६ हून अधिक कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. आता भारतीय लष्करातही कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समजत आहे. लष्करातील एका जवानाची कोरोनाची चाचणी पोझिटिव्ह आली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, लडाख येथे भारतीय लष्कराचा एक जवान कोरोनाग्रस्त असल्याचे समजत आहे. सदर जवानाचा रिपोर्ट पोझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर जवानाचे वडील २७ फेब्रुवारी रोजी इराणहून भारतात परतले होते. जवानाचे वय ३४ असून लडाख इथे पोस्टिंग होते.

दरम्यान, जवानाच्या वडिलांना २९ फेब्रुवारीला क्वारंटाईनमध्ये पाठवण्यात आले होते. ६ मार्चला ते कोरोना पोझिटिव्ह असल्याचे समोर आले. तर जवान २५ फेब्रुवारिपासून १ मार्चपर्यंत सुट्टीवर होता. यातूनच जवानाला कोरोना झाल्याचे समजत आहे.