Wednesday, February 8, 2023

भीमा कोरेगाव चौकशी समितीकडून शरद पवारांना बोलावणं

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्यातील कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर भीमा कोरेगाव चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या दंगलीचे धागेदोरे उलगडण्याचा या समितीचा प्रयत्न असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना या चौकशी समितीने ४ एप्रिल रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

कोरेगाव भीमा दंगलीमध्ये राहुल फटांगळे या युवकाचा मृत्यु झाला होता. ही दंगल मिलिंद एकबोटे आणि संभाजी उर्फ मनोहर भिडे यांच्या संगनमताने घडून आणली गेली असा एक मतप्रवाह आहे. तर दंगलीला शहरी नक्षलवादी कारणीभूत आहेत असं हिंदुत्ववादी संघटनांचं म्हणणं आहे.

या प्रकरणाबाबत शरद पवार यांनी वारंवार सूचनादर्शक विधानं केल्यामुळे त्यांना चौकशीसाठी बोलावलं असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय संस्थांकडे या घटनेचा तपास जाऊ नये अशी मागणी शरद पवार यांनी महाविकासआघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर केली होती. आता चौकशीवेळी शरद पवार नेमकं काय बोलणार याकडे महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागून राहिलेलं असेल.

ब्रेकिंग बातम्या आता थेट मोबाईलवर मिळवा. आमच्या 8080944419 या नंबरला Whatsapp करा आणि लिहा Hello News

हे पण वाचा –

करोनामुळं रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट झालं ५० रुपयाला; लोकलला सुद्धा लागू शकतो ब्रेक

करोनामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित

करोनाला फाट्यावर मारत धोनीने मारली बाईकवरून रपेट; पहा व्हायरल व्हिडिओ!

करोनामुळे महाराष्ट्रातील ‘ही’ देवस्थानं भाविकांसाठी बंद

‘या’ देशात चीनपेक्षा जास्त वेगाने पसरतोय कोरोना! २४ तासात सापडले ३५९० रुग्न