साताऱ्याचे जवान सुधीर निकम मुंबईत कर्तव्य बजावताना शहीद

Sudhir Nikam
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके

सैनिकांचा जिल्हा आणि सैनिकांचे गाव अशी ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील अपशिंगे मिलिटरी गावचे सुपुत्र जवान सुधीर सूर्यकांत निकम यांचे कर्तव्य बजावत असताना मुंबईत आज पहाटे निधन झाले. वडिलांच्या नंतर देशसेवेत असलेल्या सुधीर निकम यांच्या निधनामुळे गावात शोककळा पसरली आहे.

मुंबईत येथे देशसेवेत असलेल्या जवान सुधीर निकम यांचे वडील सूर्यकांत शंकर निकम हेही देशसेवेसाठी लढले. त्यांच्या नंतर त्यांचे दोन सुपुत्र सुधीर आणि सागर हेही देशसेवेसाठी सैन्यात दाखल झाले. दरम्यान, आज पहाटे मुंबईत जवान सुधीर निकम यांचे निधन झाले. त्यांच्यावर उद्या (बुधवार) अपशिंगे येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तत्पूर्वी शहीद जवान सुधीर निकम यांची अंत्ययात्रा गावातून काढली जाणार असून गावातील विजय स्तंभ येथे मिलिटरी परेड होऊन श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.

अपशिंगे मिलिटरी हे गाव साताऱ्याच्या दक्षिणेकडे 18 किमीवर वसलेले आहे. 1600 घरे आणि अवघी सहा हजार लोकसंख्या या गावात आहे. या गावाचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक कुटुंबातील किमान एक व्यक्ती भारतीय सैन्यामध्ये आपली सेवा देत आहे, तर शेकडो फौजी अधिकारी या गावाने देशाला समर्पित केले आहेत. या साऱ्यांनीच देशासाठी रक्त सांडताना आपल्या गावाचं आणि देशाचं नाव रोशन केले आहे.

वडीलही होते देशसेवेत –

देश सेवा बजाविताना आले वीरमरण सूर्यकांत शंकर निकम सन 1995 रोजी सिक्कीम येथील गंगटोक येथे देश सेवा बजावित असताना शहीद झाले. मात्र, त्यांचा वसा आज त्यांची दोन्ही मुले सुधीर आणि सागर पुढे चालवत आहेत, तर त्यांच्या कुटुंबातील एकूण 25 सैनिक देशासाठी सेवा देत आहेत.

https://www.facebook.com/photo.php?fbid=593438332144220&set=a.583392906482096&type=3

उदयनराजेंची फेसबुक पोस्ट

साताऱ्याचे जवान सुधीर निकम शहीद झाल्याची बातमी मिळताच खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून जवान सुधीर निकम यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच अखंड देशसेवेसाठी देह अर्पण केलेल्या अपशिंगे (मिलिटरी) ता. सातारा या गावचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्रात प्रचलित आहे. शूरवीरांचा व सैनिकी परंपरा लाभलेल्या सातारा जिल्ह्यातील युवकांनी आजपर्यंत आपल्या जीवाची बाजी लावून स्वतःला देशसेवेसाठी अर्पण केल व देशाचे रक्षण केले. या पुढेही ही परंपरा सुरू राहील यात शंका नाही. कै. शहीद सूर्यकांत शंकर निकम यांचे जवान सुधीर हे चिरंजीव होते. वडिलांनी देशसेवेसाठी आपले देह अर्पण केल्यानंतर आज त्यांचा सुपुत्र शहिद होतो. अभिमान व गर्व आहे या कुटुंबाचा, अशा शब्दात उदयनराजे यांनी जवान सुधीर यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.