मुंबई । अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी बुधवारी रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला अटक केली. त्यानंतर राज्यासह देशभरात भाजपा कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकारविरोधात आंदोलन केले. अर्णबला एका वैयक्तिक गुन्ह्यात अटक झाली असून त्याचा पत्रकारितेची काही संबंध नाही, त्यामुळे अर्णबसाठी रडणं बंद करा असा टोला शिवसेनेने लगावला. अर्णब भाजपाचा कार्यकर्ता आहे का? असा सवाल उपस्थित केला.
दरम्यान, शिवसेनेच्या या प्रश्नात खरच दम आहे का? यासाठी अर्णब गोस्वामीच्या इतिहासाबाबत माहिती काढली असता भाजप आणि अर्णव गोस्वामींचे कुटुंब यांतील नात्यातील माहिती समोर आली. अर्णबचा जन्म ९ ऑक्टोबर १९७३ रोजी आसामच्या गुवाहाटी येथे झाला, अर्णबचे वडील मनोरंजन गोस्वामी हे सेवानिवृत्त कर्नल आहेत, नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर अर्णबच्या वडिलांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता.
इतकचं नाही तर मनोरंजन गोस्वामी यांनी १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत गुवाहाटी मतदारसंघातून भाजपाकडून निवडणूक लढली होती, या निवडणुकीत काँग्रेसच्या भुवनेश्वर कलिता यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता, मनोरंजन गोस्वामी यांना या निवडणुकीत २७ टक्के मतदान झालं होतं. अर्णब गोस्वामी यांचे मामा सिद्धार्थ गोस्वामी हेदेखील भाजपाशी जोडलेले आहेत. ते भाजपाचे आमदार असून आसाम सरकारमध्ये शिक्षणमंत्री आहेत. १९९५ मध्ये सिद्धार्थ भट्टाचार्य भाजपात सहभागी झाले होते, २०१६ मध्ये त्यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष बनवले होते.
अर्णबने १९९५ मध्ये पत्रकारितेला सुरुवात केली, द टेलिग्राफ, एनडीटीव्ही, टाईम्स नाऊ आणि त्यानंतर रिपब्लिक टीव्ही संपादक असा अर्णब गोस्वामीचा प्रवास राहिला आहे. २०१६ मध्ये अर्णब गोस्वामी यांनी टाईम्स नाऊमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर २०१७ मध्ये रिपब्लिक टीव्ही सुरु केला. याच रिपब्लिक टीव्हीच्या स्टुडिओ कामानिमित्त अन्वय नाईक आणि अर्णब गोस्वामी यांचा संबंध आला होता. अर्णब गोस्वामी यांनी स्टुडिओच्या कामाचे पैसे थकवल्याने अन्वय नाईक यांनी आत्महत्या केल्याचं आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
या' गोष्टींमुळं आता अर्णव गोस्वामींच्या पत्नीलाही अटक होण्याची शक्यता; कधीही निघू शकतो वारंट
वाचा सविस्तर-👉 https://t.co/73yTFO7pHF@arnabofficial9 #HelloMaharashtra #mumbaipolice— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 5, 2020
लॉकडाऊनमध्येही EMI भरणाऱ्यांसाठी गुड न्यूज! बँकांकडून खात्यात पैसे होतायत जमा, लगेच करा चेक
वाचा सविस्तर-👉 https://t.co/ZeSn7yF7GH#emi #lockdown #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 5, 2020
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in