“किरीट सोमय्यांकडून अर्णबला वाचविण्यासाठी अन्वय नाईकला धमक्या”; संजय राऊतांच्या गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आज सकाळी रायगड जिल्ह्यातील कोर्लाई गावास रवाना झाले. त्यांच्याकडून तिथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि माजी मंत्री रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांच्या जमिनीची पाहणी केली जाणार आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. किरीट … Read more

मुकेश अंबानींच्या सुरक्षेवरून आक्रमक होणारा पक्ष अन्वय नाईक प्रकरणी गप्प का?? नाईक मायलेकिंचा सवाल

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुकेश अंबानी आणि मनसुख हिरेन प्रकरणी विधानसभेत जोरात आक्रमक होऊन विधानसभा हादरवून सोडणारे विरोधी पक्षनेत्यांनी तशीच भूमिका अन्वय नाईक प्रकरणात (Anvay Naik) का घेतली नाही. मुकेश अंबानी यांच्या घरापासून ५०० मीटरवर जिलेटिननं भरलेली गाडी सापडल्यावर विधानसभेत आक्रमक होणारा, गदारोळ करणारा पक्ष आमच्या प्रकरणात शांत का?, असा सवाल नाईक मायलेकींनी उपस्थित केला. … Read more

अखेर अर्णव गोस्वामींना सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर

नवी दिल्ली । अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामींना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. अर्णव गोस्वामींसह इतर दोन जणांना अंतरिम जामीन देण्यात आला आहे. (Supreme Court grant interim bail to Arnab Goswami) सर्वोच्च न्यायालयाने अर्णव गोस्वामी यांना 50 हजारांच्या हमीवर अंतरिम जामीन मंजूर केला. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रायगड पोलिसांना कार्यवाही करण्याचे … Read more

… मग उद्धव ठाकरेंनाही अटक करणार का? सुप्रीम कोर्टात हरिश साळवेंची अर्णव गोस्वामींच्या बाजूने जोरदार बॅटिंग

नवी दिल्ली । अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज अर्णव गोस्वामी यांच्या अंतरिम जामिनासाठी सुनावणी होत आहे. यावेळी अर्णव गोस्वामी यांच्या बाजूने ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांनी युक्तिवाद केला. आजच्या सुनावणीत वकील हरिश साळवे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले आहे. राज्यात काही दिवसांपूर्वी एसटीच्या कर्मचाऱ्याने वेतन न मिळाल्यामुळे आत्महत्या केली. मुख्यमंत्र्यांनी पगार … Read more

…मग अर्णव गोस्वामींवरच इतकी मेहरबानी का? जामिनासाठी तातडीच्या सुनावणीवर बार कौन्सिलने घेतला आक्षेप

नवी दिल्ली । अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेले रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी (Arnab goswami ) यांच्या जामिनाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयातील तातडीच्या सुनावणीवर बार कौन्सिलचे अध्यक्ष दुष्यंत दवे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अर्णव गोस्वामी यांना लगेचच कशी सुनावणी मिळते. अर्णव गोस्वामी यांच्यावर इतकी मेहरबानी का, असा सवाल … Read more

कोरोनामुळं कैद्यांना नातेवाईकांना भेटण्याची परवानगी नाही, म्हणून अर्णब यांनाही.. – गृहमंत्री देशमुख

मुंबई । कोरोना संकटात कैद्यांना नातेवाईकांना भेटण्याची परवानगी नाही. गेली ४ महिने कैदी आपल्या नातेवाईकांना भेटले नाहीत. त्यामुळं अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या कुटुंबाला तुरुंगात भेटता येणार नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. अर्णब गोस्वामींच्या सुरक्षेची चौकशी करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देशमुखांना फोन केला होता. अर्णब यांना कुटुंबियांना भेटु द्यावे असे ते म्हणाले. त्यावर … Read more

फडणवीसांचे हायकोर्टाला साकडं; अर्णव गोस्वामीला कोठडीत होत असलेल्या त्रासाची दखल घ्यावी

मुंबई । अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात अटकेत असलेले पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या बचावासाठी आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस पुढे सरसावले आहेत. फडणवीस यांनी सोमवारी ट्विट करुन अर्णव गोस्वामी प्रकरणात उच्च न्यायालयाने स्यूमोटो याचिका दाखल करण्याची मागणी केली. अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यापासून ते न्यायालयीन कोठडीत त्यांना ज्याप्रकारे वागणूक दिली जात आहे, याबाबत बऱ्याच चर्चा सुरु आहेत. … Read more

पुन्हा झटका! अर्णव गोस्वामींचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळला; ‘जेल’वारी लांबली

मुंबई । अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात अटकेत असलेले पत्रकार अर्णव गोस्वामी यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज मुंबई हायकोर्टानं फेटाळला आहे. कोर्टानं त्यांना जामिनासाठी सत्र न्यायालयात याचिका करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे आता अर्णव यांना जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे. तसेच सत्र न्यायालयातून जामीन मिळेपर्यंत त्यांना तळोजा तुरुंगातच राहावं लागणार आहे. अर्णव गोस्वामी यांच्यावतीने त्यांच्या वकिलाने एफआयआर … Read more

तारीख पे तारीख! अर्णव गोस्वामींचा तुरुंगातील मुक्काम वाढला; आता सुनावणी सोमवारी

मुंबई । अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अर्णवसह अन्य दोघा आरोपींची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र, ही सुनावणी आजही पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता अर्णव यांच्या पोलीस कोठडीच्या निर्णयाबाबत 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. (Arnab Goswami Police Custody hearing Postpone) अन्वय नाईक आत्महत्या … Read more

अर्णब गोस्वामींना तातडीने अंतरिम जामीन देण्यास हायकोर्टाचा नकार; कोठडीतील मुक्काम वाढणार?

मुंबई । अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना तातडीने अंतरिम जामीन देण्यास हायकोर्टाने गुरुवारी नकार दिला. मूळ तक्रारदार आणि पोलिसांचं म्हणणं ऐकल्याशिवाय अंतरिम दिलासा देण्याचा निर्णय दिला जाऊ शकत नाही असे न्यायालयाने म्हटलं. अन्वय यांच्या पत्नी अक्षता यांना प्रतिवादी करण्याचे आदेशही न्यायालयाने दिलेत. (mumbai hight court reject bail arnab goswami) … Read more