औरंगाबाद : श्री. जागृत दत्त मंदिर संस्थान सिडको एन -7 च्या वतीने दत्त मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त सिडकोमधील मुकुल मंदिर शाळेमध्ये आज एमपीएससीचे सेंटर होते. यामध्ये साधारण 288 परीक्षार्थी परीक्षा देणार होते. त्यापैकी बहुतांशी परीक्षार्थी बाहेरगावहून परीक्षा घेण्यासाठी येथे आले होते. या सर्व विद्यार्थ्यांना तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना साधारणत: 375 जणांना पुरेल इतक्या पुरी भाजीची पॅक कंटेनरमध्ये देण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
संस्थानच्या वतीने पुरी भाजी व पाण्याच्या बाटलीचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज शहरात लोकडाऊन असल्याने सर्व हॉटेल बंद असल्यामुळे विद्यार्थी, शिक्षकांची व पोलीस कर्मचारी यांची गैरसोय होऊ नये व अतिथी धर्माचे पालन म्हणून माध्यमाच्या वेळी श्री. दत्त महाराजांचा प्रसाद म्हणून सर्व विद्यार्थ्यांना पुरी भाजीचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थांचे अध्यक्ष गणेश जोशी तसेच सिडको पोलीस ठाण्याचे पीआय अशोक गिरी, मुकुल मंदिरचे मुख्याध्यापक चौधरी सर, माजी नगरसेविका सौ. रेखाताई पाटील यांच्या हस्ते प्रसादाचे वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश जोशी, राजेश इंजे पाटील, पद्माकर दिवाण, शिवकुमार थारेवाल, दिनेश बागुल . उद्धव गुरुजी, सौ. रेखाताई पाटील, आनंद मालोदे, उमेश जोशी, संतोष लगामे, उमेश काळे, प्रणित जोशी, अमित सीमंत, प्रेमराज पैठणे, राहुल खंडागळे, प्रदीप परदेशी, गणेश साळुंके, कैलास विश्वकर्मा, हरी हरी शरद गुरुजी, सुधीर पोद्दार, योगेश वडगावकर व जयेश वडगावकर आदींनी परिश्रम घेतले.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group