चेन्नई । भारताचा कर्णधार विराट कोहलीला अटक करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. चेन्नईच्या एका वकिलाने मद्रास उच्च न्यायालयात कोहलीविरोधात याचिका दाखल केलेली आहे. कोहली हा जनतेची दिशाभूल करत असून त्यामुळे बऱ्याच लोकांना व्यसन लागले आहे, असे या याचिकेच म्हटले गेले आहे.
विराटने ऑनलाईन जुगाराच्या ऍपची जाहिरात केली. या जाहिरातीमध्ये कोहलीने लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. या ऍपमध्ये जुगार खेळण्यासाठी एका मुलाने उसणे पैसे घेतले होते. या पैशांची परतफेड करता न आल्यामुळे त्या मुलाने आत्महत्या केली, ही गोष्टही या याचिकेमध्ये दाखल करण्यात आली आहे. लोकांमध्ये ऑनलाईन जुगाराचे व्यसन वाढत चालले आहे. त्यामुळे या ऍपवर बंदी आणायला हवी, असेही या याचिकेत म्हटले आहे.
कोहली आणि सेलिब्रेटी तमन्ना हे दोघे या ऍपची जाहिरात करून लोकांची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे विराट आणि तमन्ना या दोघांनाही अटक करावी आणि ऑनलाईन जुगारावर बंदी आणावी, असे या याचिकेमध्ये म्हटले गेले आहे. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता मंगळवारी या याचिकेवर मद्रास उच्च न्यायालयात नेमकी काय सुनावणी होते, याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागलेले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”