पिता- पुत्रासह चाैघांना अटक : विना परवाना वाढदिवसाला गर्दी जमविणे पडले महागात

0
100
Satara Police City
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | लक्ष्मी टेकडी, सदरबझार येथे विना परवाना वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसात पिता-पुत्रासह चाैघांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी यामध्ये लाऊडस्पीकरचे साहित्य जप्त केले आहे. सुरज सुखपाल सोळंकी, मुलगा अमित सोळंकी (रा.सदरबझार), उमाकांत नागे, उमेश गायकवाड (रा. जुनी भाजी मंडई, सदरबझार) यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुरज सोळंकी यांच्या मुलाचा वाढदिवस दि. 19 रोजी होता. वाढदिवसासाठी विना परवाना मोठी गर्दी करून लाऊडस्पीकर लावल्याने परिसर दणाणून गेला. लक्ष्मी टेकडी परिसरातील या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मोरे, पोलीस हवालदार राहुल खाडे, सुनील कर्णे, संतोष कचरे, विजय गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच अनेकजण पसार झाले.

पोलिसांनी याप्रकरणी लाऊडस्पीकर जप्त केला. पोलिसांच्या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली. प्राथमिक माहिती घेत संबंधितांना ताब्यात घेवून त्यांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले. विविध कलमान्वये गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here