माझ्यावर आणि धनंजय मुंडेंवर चित्रपट बनवल्यास सुपर डुपर चालेल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या वरील आरोपांमुळे चर्चेत आलेल्या करुणा शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी च नवा पक्ष स्थापन केला आहे तसेच आगामी कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीत देखील त्या लढत आहेत. त्यातच आता त्यांच्या एका विधानाने चर्चाना उधाण आले आहे. माझ्यावर आणि धनंजय मुंडे यांच्या वर एखादा चित्रपट तयार केला तर तो सुपर डुपर होईल अस त्यांनी म्हंटल आहे.

चित्रपट काढायचा असेल तर सर्वात मोठा विषय मीच आहे, करुणा धनंजय मुंडे. महाराष्ट्रातलं राजकारण कसं आहे आणि इथली नेतेमंडळी कशी आहे, इथल्या सर्वसामान्य लोकांची काय स्थिती आहे हे मला माहीत आहे. मी गेल्या २५ वर्षांपासून राजकारण पाहत आले. महाराष्ट्राच्या राजकारणावर धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट काढला तर हो सुपर डुपर चालेल’, असं वक्तव्य करुणा शर्मा यांनी केलंय.

दरम्यान, आगामी परळी विधानसभा निवडणूकी साठी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांना थेट आव्हान दिले आहे. काहीही झालं तर नवरा विरुद्ध बायको अशी लढत होणारच अस त्या म्हणाल्या होत्या. दरम्यान, मागील वर्षी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. या आरोपानंतर महाराष्ट्रातलं राजकारण चांगलंच तापलं होतं.

Leave a Comment