औरंगाबाद : निशांत मल्टीस्टेट को – क्रेडिट सोसायटी लि. अकोलाच्या रेल्वे स्टेशन रोड औरंगाबाद या शाखेत बनावट सोने ठेवून 26 लाख 23 हजार रुपयांचा गंडा घातलेल्या प्रकरणी वेदांत नगर पोलिसांनी मंगळवारी दुपारी एका महिलेला अटक केली आहे.
लिलाबाई राजू मस्के वय 34 (रा. मुकुंदवाडी) असे आरोपी महिलेचे नाव आहे. तिला न्यायालयीन कोठडी करण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी पी. पी. मुळे यांनी बुधवारी दिले. निशांत मल्टीस्टेट को – ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लि. अकोलाची शाखा औरंगाबाद रेल्वे स्टेशन रोडवर आहे. आरोपी लिलाबाई मस्के हिने बनावट सोन्याची पोत पत्ता आणि मनी गहाण ठेवून 56 हजार 500 रुपयांचे कर्ज उचलले.
आरोपींनी देखील गोल्ड व्हॅल्यूअर सचिन शहाणे यांच्या मदतीने वेळोवेळी बनावट सोने गहाण ठेवून 26 लाख 23 हजार 900 रुपयांचे कर्ज उचलले. सोन्याची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी शहाणे यांचे असताना देखील त्यांनी त्यात निष्काळजीपणा करून बनावट सोने बँकेत तारण ठेवून ते खरे असल्याचे प्रमाणपत्र दिले .असल्याचे संतोष शेषराव शेवाळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.