Artificial Intelligence : AI चॅटबॉटमूळे साधला मृत आईशी संवाद; कोणी केला चकित करणारा दावा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Artificial Intelligence) गेल्या काही काळात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मोठी झेप घेतली आहे. दिवसेंदिवस आधुनिक तंत्रज्ञान प्रचंड विकसित होताना दिसत आहे. आजच्या डिजिटल युगात AI टूल्सचा वापर प्रचंड प्रमाणात केला जात आहे. AI टूल्सची प्रगती अत्यंत उल्लेखनीय आहे. दरम्यान, आपल्या दैनंदिन जीवनात आधुनिक तंत्रज्ञानाचे पुरावा म्हणून सिद्ध झालेली अशी अनेक साधने आहेत जी आपले आयुष्य सुखकर करत आहेत. या विकसित तंत्रज्ञानामुळे आपण अनेक कामे वेगाने आणि सोप्या पद्धतीने करू शकतोय. अशातच एका महिलेने AI टूलसंदर्भात केलेला दावा अत्यंत आश्चर्यचकित करणारा आहे.

चकित करणारा दावा

एका महिलेने AI टूल संदर्भात एक अत्यंत आश्चर्यकारक दावा केला आहे. या महिलेने म्हटले आहे की, (Artificial Intelligence) AI टूलद्वारे तिने आपल्या मृत आईशी संवाद साधला आहे. एका वृत्तानुसार, सिरीन नावाच्या एका महिलेने AI टुलबाबत दावा केलाय की, तिने या टूलचा वापर करून आपल्या मृत आईसोबत संवाद साधला आहे. या महिलेचे म्हणणे आहे की, तिच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर ती अत्यंत दुःखी कष्टी होती. तिला आयुष्यातील ही घटना मागे सोडून पुढे जाता येत नव्हते.

आपल्या आईच्या अत्यंत जवळ असल्यामुळे तिला आईच्या मृत्यूची घटना सहन झाली नव्हती. अशा परिस्थितीत आपल्या आईच्या आठवणीने व्याकुळ झाल्यामुळे तिने AI (Artificial Intelligence) टूलची मदत घेतली आणि आपल्या मृत आईशी संवाद साधला असे तिने एका मुलाखतीत सांगितले आहे. यावेळी तिने मृत व्यक्तीशी संबंधित काही महत्वपूर्ण माहितीदेखील प्रदान केली. जसे की, या मृत व्यक्तीचे वय, तिच्याशी आपले काय नाते आहे आणि इतर.

आधुनिक ॲप (Artificial Intelligence)

आपल्या आईचा विरह सहन न करू शकल्याने सिरीनने या टूलचा वापर केला. तिने आपल्या आईशी संवाद साधण्यासाठी लढवलेली ही शक्कल काहीशी विचित्र वाटू शकते. मात्र हे करण्यामागे तिच्याकडे एक ठोस कारण होते. ते असे की, सिरीनला तिच्या मुलीची आपल्या मृत आईशी ओळख करून द्यायची होती. यासाठी सिरीनने AI टूलचा वापर केला. (Artificial Intelligence) ज्यामुळे तिच्यासमोर हुबेहूब तिच्या आईसारखे चित्र उभे राहिले. जे पाहून तिला आणि तिच्या मुलीला प्रचंड आश्चर्य आणि तितकाच आनंद झाला. आपल्या आईला अशा प्रकारे अगदी समोर पाहून ती खूप भावूक झाली. मात्र, तिचा मूळ उद्देश पूर्ण झाल्याचा तिला आनंद होता.

हे कसे शक्य आहे?

हे सर्व केवळ OpenAI च्या GPT2 मूळे शक्य आहे. यासाठी आपल्याला AI चॅटबॉटला संबंधित व्यक्तीची सर्व माहिती द्यावी लागेल. यानंतर, एआय चॅटबॉट मृत व्यक्तीची माहिती जमा करून एक प्रोफाइल तयार करतो. या प्रोफाईलच्या माध्यमातून आपल्या समोर जे चित्र उभं राहतं ते अगदी जिवंत आणि हुबेहूब असते. या ॲपचे संस्थापक जेसन रोहरर यांचे म्हणणे आहे की, आतापर्यंत ३ हजारपेक्षा जास्त लोकांनी या विकसित तंत्रज्ञानाचा वापर आपल्या गमावलेल्या प्रिय व्यक्तीशी बोलण्यासाठी केला आहे. त्यामुळे हे सिद्ध होतंय या विकसित तंत्रज्ञानामुळे केवळ डिजिटल युगात गती आलेली नाही तर मानवी जीवनावर देखील याचा प्रचंड प्रभाव पडतो आहे. (Artificial Intelligence)