Home Remedies For Headache | डोकेदुखी असह्य होत असेल, तर ‘हे’ 5 घरगुती उपाय नक्की करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Home Remedies For Headache |आजकाल डोकेदुखी ही एक खूप सामान्य समस्या झालेली आहे. आजच्या या धकाधकीच्या जीवनात अनेकांना डोकेदुखीचा त्रास होत असतो. आणि यापासून आराम मिळवण्यासाठी लोक पेनकिलर किंवा इतर गोळ्या घेतात. आणि तात्पुरतं त्यापासून सुटका मिळवतात. परंतु जास्तीत जास्त औषधांचे सेवन करणे देखील तुमच्या आरोग्यासाठी चांगले नसते. याचे तुम्हाला नंतर दुष्परिणाम भोगावे लागतात. पण म्हणूनच आज आम्ही तुम्हाला औषधांशिवाय तुमची डोकेदुखी कशी दूर करता येईल याची माहिती देणार आहोत.

तुम्हाला सतत डोकेदुखीचा (Home Remedies For Headache) त्रास होत असेल तर तुम्ही कपाळावर कोल्ड कॉम्प्रेस ठेवू शकता. त्याचप्रमाणे स्तुती कपड्यांमध्ये बर्फाचे तुकडे ठेवून डोक्याला लावले आणि थंड पाण्याने डोके धुतले तर तुम्हाला डोकेदुखीपासून आराम मिळेल.

डोकेदुखी मागे अनेक कारणे असतात ती ओळखणे देखील गरजेचे असते. अनेकवेळा टोपी, स्विमिंग गॉगल किंवा घट्ट रबरबँड घातल्यामुळे देखील डोकेदुखी होते. असे जाणवताच तुम्ही डोक्याच्या मागच्या भागाला बोटाने मसाज करा त्यामुळे तुम्हाला जरा बरे वाटेल.

डोकेदुखी पासून आराम मिळण्यासाठी ॲक्युप्रेशर हा खूप चांगला पर्याय आहे. तुमचे जर डोके दुखत असेल तर तुम्ही तुमच्या हाताचा अंगठा आणि तर्जनी यांच्यातील जागेवर हलक्या हाताने मालिश केली तर तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.

तुम्ही जर जास्त वेळ च्युइंगम खात असाल तरी देखील तुम्हाला डोकेदुखी होऊ शकते. असे केल्याने जबड्यापासून वेदना सुरू होते आणि ती डोक्यापर्यंत पोहोचते. या गोष्टीनंतर हाताळणे खूप कठीण जाते. अशा परिस्थितीत तुम्ही पाण्यात आले टाकून ते पाणी पिऊ शकता.

डोकेदुखीचा (Home Remedies For Headache)सतत त्रास होत असेल तर पुदिन्याची पाने मिक्सरमध्ये वाटून जर त्याचा रस कपाळावर लावला तरी देखील तुम्हाला आराम मिळेल. डोकेदुखी दूर करणारे अनेक औषधी गुणधर्म या पुदिनांमध्ये असतात. त्यामुळे याने काही अंशी का होईना पण तुम्हाला डोकेदुखी पासून नक्कीच सुटका मिळेल.