राम मंदिराच्या भूमिपूजनाप्रसंगी रामायण ‘फेम’ अरुण गोविल म्हणाले..

अयोध्या । अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडत आहे. वैदिक मंत्रोच्चारात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या विधीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, देशभरातील नागरिकांनी आहे तिथूनच हा सोहळा साजरा करण्याचे आवाहन भाजपाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या सामान्य जनतेपासून ते कलाविश्वातील सेलिब्रिटींपर्यंत ही एकच चर्चा रंगली आहे. अशातच ‘रामायण’ या मालिकेत भगवान ‘राम’ हे पात्र साकारणारे अरुण गोविल यांनी केलेल्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अरुण गोविल यांनी ट्विट करत भारताच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिले जाणार आहे असे म्हटले आहे. राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली आहे. रस्तोरस्ती स्वागतांचे फलक, सहज कानी पडणारे भजन, रामनामाचा गजर आणि लखलखती विद्युत रोषणाई असे चित्र अयोध्येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. यावर अनेक कालाकार आपल्या प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त करत आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हेलिकॉप्टरद्वारे अयोध्येत भूमिपूजनासाठी दाखल झाले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं स्वागत केलं. यांनतर पंतप्रधान मोदींनी अयोध्येतील हनुमानगढी मंदिरात केली पूजा, मंदिराची केली परिक्रमा. यांनतर पंतप्रधान मोदी यांनी रामलल्लाचे दर्शन घेतलं. पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्याहस्ते या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं. यांनतर पंतप्रधान मोदी रामजन्मभूमी स्थळावर भूमिपूजन सोहळ्यासाठी पोहोचले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

You might also like