अरुण जेटली आज स्वीकारणार पदभार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | बरेच दिवस आजारी असणारे देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली सध्या बरे झाले असून ते आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. १४ मे २०१८ रोजी त्यांच्यावर दिल्ली एम्समध्ये मुत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली होती. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना दोन महिने सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले होते. तीन महिन्याहून अधिक काळ सुट्टी असलेल्या जेटलींनी आज पदभार स्वीकारण्याचे ठरवले आहे.
जेटली रजेवर असतांना त्यांच्या अर्थ खात्याचा पदभार अतिरिक्त स्वरूपात रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे सोपवण्यात आला होता. जेटली आज आपल्या कक्षात जाऊन आपल्या कामाला नव्याने सुरुवात करणार आहेत. जेटली रजेवर असताना संसदेचे पावसाळी अधिवेशन पार पडले होते.जेटली हे राज्यसभेचे सभागृह नेते आहेत तसेच सरकारची बाजू राज्यसभेत ते मुत्सद्दीपणाने मांडत असतात. म्हणूनच जेटली रजेवर असण्याचा फायदा उठवण्याची रणनीती काँग्रेसने अधिवेशन काळात आखली होती.
अरुण जेटली हे मागील दोन वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्या आजाराचा परिणाम कामावरती होत होता म्हणून त्यांनी शस्त्रक्रिया करून घेण्याचा निर्णय घेतला.

Leave a Comment