अरविंद केजरीवाल यांनी घेतला मोठा निर्णय! शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोग लागू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दल्ली | नुकतेच महाराष्ट्रात अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोग लागू करावा या व इतर मागण्यासाठी उपोषण केले. त्यातच अण्णा हजारे यांचे शिष्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शेतकऱ्यांसाठी आज मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी ‘आम आद्मी पार्टी’ लागू करत असल्याचे केजरीवाल यांनी घोषणा केली.

आजच्या काळात खूप चर्चेचा असलेला विषय म्हणचे स्वामिनाथन आयोग. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आयोगाच्या शिफारशी लागू करणे खूप गरजेचे आहे. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नुकतेच महाराष्ट्रात आंदोलन छेडले होते, स्वामिनाथन आयोग ही त्यातील प्रमुख मागणी होती.

गव्हासाठी २६१६ रुपये प्रति क्विंटल तर तांदूळ २६६७ रु प्रति क्विंटल अशाप्रकारे इतर पिकांसाठीही हमीभाव जाहीर केले आहेत. आमचे सरकार ‘स्वामिनाथन आयोग’ लागू करत असल्याचे व लोकांकडून येणाऱ्या सूचनांचे त्यांनी स्वागतच आहे’ असे आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आज दुपारी १२ च्या सुमारास ट्विट केले. दिल्ली हे ‘स्वामिनाथन आयोग’ लागू करणारे पाहिले राज्य ठरणार आहे.

काय आहेत स्वामिनाथन आयोगाच्या महत्वाच्या शिफारसी?

१. शेतकऱ्यांना असा हमीभाव मिळावा की त्यांचा सरासरी उत्पादन खर्चाच्या ५०% इतका नफा देणारा असावा. म्हणजेच एकूण विक्रीच्या ३३.३३% इतका नफा हा शेतकऱ्यांना मिळावा.
२.दहा जणांचा समूह करून त्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे.
शेतकरी संस्था या लहान पण सहकार तसेच व्यवसाय तत्वावर असाव्यात.
कर्जाचा कालावधी हा कर्जाचा उपयोग व कर्जधारकाची परिस्थिती यावर अवलंबून असावा.
व्याजाचा दर हा सुरुवातीला जास्तीचा परंतु इतर कर्जे देणाऱ्यांपेक्षा कमी असावा.
३. शेतकरी आणि त्याच्या कुटुंबियांसाठी आरोग्य विमा
४. जीवन विमा तसेच निवृत्तीवेतन
५. व्यवसायातील धोक्यांपासून संरक्षण मासेमारी करणाऱ्यांसाठी मासेमारीबंदीच्या काळात निर्वाह निधी जो रुपये १५००/- दरमहा असावा.
६.शेती आणि जनावरांसाठी जमीन हा महत्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रीय जमीन उपयोगिता सल्लागार मंडळाची स्थापना व्हावी. हे मंडळ जमिनीचा कस, हवामान, पर्यावरण, विपणन (मार्केट) इत्यादीचा अभ्यास करून शेती विषयी सल्ले देईल.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि  हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी  आजच आमचा  WhatsApp  ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra

 

इतर महत्वाचे –

शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा असल्यास या गोष्टी करा, प्रशांत किशोर यांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

राज ठाकरे यांची आण्णा हजारेंसोबत बंद खोलीत चर्चा, पहा काय झाली बातचीत?

महिनाअखेरीस दोन शक्तिशाली नेते एकमेकांच्या भेटीला

Leave a Comment