“मराठवाड्यातील भूमिपुत्र म्हणुन प्रलंबित कामांचा अनुशेष भरून काढणार” – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र | परभणी प्रतिनिधी

मागील पाच वर्षात मराठवाड्यातील रस्ते कामांकडे फार दूर्लक्ष झाले असुन, मराठवाड्याला याकरीता निधीच उपलब्ध होत नव्हता. सुदैवाने ही संधी मराठवाड्याकडे आल्याने तसेच मराठवाड्याचा भूमिपुत्र म्हणून मराठवाड्यातील प्रलंबित कामाचा अनुशेष भरुन काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

परभणी तालुक्यातील जांब येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण, जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन आणि नाबार्ड 36 अंतर्गत बाभूळगाव ते मांडाखळी ग्रामीण रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रम 27 फेब्रुवारी घेण्यात आले यावेळी अशोक चव्हाण हे बोलत होते. यावेळी खासदार संजय जाधव, आमदार सुरेश वरपुडकर, डॉ. राहुल पाटील, बाबाजानी दुर्रानी, सुरेश देशमुख, राजेश विटेकर, तुकाराम रेंगे पाटील, सुरेश नागरे जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, लोकप्रतिनिधीनी अधिक लक्ष देवून आपल्या मतदार संघातील जेवढ्या शाळा चांगल्या करता येतील तेवढ्या चांगल्या कराव्यात. याशाळा करीता निधी डिपीसी, आमदार निधी किंवा अन्य मार्गाने उपलब्ध करुन दिला पाहिजे. कारण मराठवाड्यामध्ये या गोष्टींची कमतरता आहे. रस्त्यांचे विषय आहेत. मला याठिकाणी सांगताना आनंद होत आहे, परभणी शहराकरीता 80 कोटी रुपयांचे रस्त्याकरीता मी आज मंजूरी देत असून त्याचे भूमिपूजन आज होत आहे. मागील पाच वर्षात मराठवाड्यातील रस्त्त्यांकडे फार दूर्लक्ष झाले होते.

मराठवाड्याला याकरीता निधीच उपलब्ध होत नव्हता. सुदैवाने ही संधी मराठवाड्याकडे आली आहे. यामुळे मराठवाड्यातील कोणताही प्रस्ताव आल्यास त्यास मंजूरी देण्याचे काम करीत आहे. अनेक वर्षापासूनचा जो आपला अनुशेष आहे तो पूर्ण झाला पाहिजे. हा अनुशेष दूर करुन जे महत्वाचे रस्ते आहेत, ते रस्ते अतिशय चांगल्या पध्दतीन करण्याचा प्रयत्न आपल्या करायचा आहे. मराठवाड्याच्या आठही जिल्ह्याला जेवढे झुकते माप देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी ते म्हणाले .

Leave a Comment