Bank Holiday | बँक हा आपल्या सर्वसामान्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आपल्याला सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून बँकेत जायची गरज पडते. मात्र ऐन वेळेस बँक बंद असली की आपली मोठी पंचायत होते. त्यामुळेच जर या सप्टेंबर महिन्यात तुम्हाला बँकेचे काही मोठे व्यवहार करायचे असतील तर त्या अगोदर रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank) सुट्ट्यांची यादी नक्की पहा. कारण सप्टेंबर महिन्यात देखील सण, उत्सव अशा अनेक कारणांमुळे बँकांना तब्बल 16 दिवसांची सुट्टी आली आहे. तसेच, रविवार, दुसरा आणि चौथा शनिवारमुळे बँका बंद राहतील.
कोणकोणत्या दिवशी बँका असतील बंद?
6 सप्टेंबर – या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी आल्यामुळे ओडिशा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहारमधील बँका सुट्टीवर असतील.
7 सप्टेंबर – जन्माष्टमी आणि श्री कृष्ण अष्टमी असल्यामुळे गुजरात, मध्य प्रदेश, चंदीगड, सिक्कीम, राजस्थान, जम्मू, बिहार, छत्तीसगड आणि झारखंड, मेघालय, हिमाचल प्रदेश श्रीनगर अशा सर्व ठिकाणी बँकांना सुट्टी असेल.
18 सप्टेंबर – या दिवशी विनायक चतुर्थी आल्यामुळे कर्नाटक आणि तेलंगणामधील बँकांना सुट्टी असेल.
19 सप्टेंबर – गणेश चतुर्थीच्या कारणामुळे महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू आणि गोव्यात ही बँका बंद असतील.
20 सप्टेंबर – गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी आणि नुआखाईमुळे ओरिसा आणि गोव्यातील बँकांना सुट्टी असेल.
22 सप्टेंबर – श्री नारायण गुरु समाधी दिवस असल्यामुळे केरळमध्ये बँका बंद असतील.
23 सप्टेंबर – चौथा शनिवार आणि हरिसिंह यांचा जन्मदिन असल्यामुळे जम्मू आणि श्रीनगरच्या बँका बंद असतील.
25 सप्टेंबर – तर आसाममध्ये श्रीमंत शंकरदेव यांची जयंती असल्यामुळे तेथील बँका बंद असतील.
27 सप्टेंबर – मिलाद-ए-शरीफमुळे देखील जम्मू आणि केरळमध्ये बँकांना सुट्टी असेल.
28 सप्टेंबर – ईद-ए-मिलादमुळे गुजरात, मिझोराम, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तराखंड, तेलंगणा, मणिपूर, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, नवी दिल्ली अशा सर्व ठिकाणच्या बँकांना सुट्टी राहील.
29 सप्टेंबर – महिन्याच्या अखेरीस ईद-ए-मिलाद-उल-नबी आणि इंद्रजात्रा असल्याने सिक्कीम, जम्मू आणि श्रीनगर येथील बँकांना सुट्टी राहील. अशा तब्बल 16 दिवसांच्या सुट्ट्या सप्टेंबर महिन्यात बँकांना असतील.