औरंगाबाद | संचारबंदीचे नियम पायाखाली तुडवत दुकानदारी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल केले जात आहे. त्यानंतर गुन्हे दाखल झालेली दुकाने उघडत असल्याने मनपा व कामगार उपआयुक्त कार्यालयाच्या पथकाने शनिवारी (दि 8) रोजी अशा 30 दुकानांना सील ठोकले यात अनेक गुडलक सहित दुकानांचा समावेश आहे. अचानक झालेल्या या कारवाईमुळे नियम मोडणाऱ्या व्यापाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
कोरोना संसर्गाचा उद्रेक रोखण्यासाठी संचारबंदी लागू केली असून. यात अत्यावश्यक सेवा जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकानांची इतर दुकानांना बंदी घातलेली आहे. त्यानंतर ही शहरातील अनेक व्यापारी संचारबंदीत शटर अर्ध्यावर ठेऊन विक्री करत आहे. यामध्ये विविध वस्तूंच्या दुकानासह रेडीमेड कपड्यांची दुकानांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशा दुकानांवर सिटी चौक आणि क्रांती चौक पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहे.
त्यानंतरही त्यांची दुकानदारी सुरू आहे. त्यामुळे गुन्हा दाखल झाल्याने दुकाने सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मनपा आणि कामगार आयुक्त अधिकारीयांना दिली. शनिवारी अशा 57 दुकानाची यादी घेत पालिकेचे अधिकारी प्रकाश आठवले यांच्या नेतृत्वाखाली. पदनिर्देशित अधिकारी आर एस पवार ,निरीक्षक सलमान काजी, स्वच्छता निरीक्षक सचिन मिसाळ, विशाल खरात, मनिष मिसाळ ,किशोर नाडे यांच्यासह कामगार अधिकारी रोहन रुमदे अमोल जाधव, दुकान निरीक्षक जी ए गावंडे, दुकाने निरीक्षक तथा सुविधाकार विठ्ठल वैद्य यांच्या संयुक्त पथकाने सराफा रोड, सिटी चौक रंगारगल्ली, गुलमंडी सिल्लेखाना, बस स्थानक सह विविध भागातील 30 दुकानांना सील ठोकण्याची कारवाई केली. उर्वरित दुकानांवर आज कारवाही होणार आहे.