कोरोना परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी : ‘आयएमए’ची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात कोरोनाचा हाहाकार मजला असताना केंद्र सरकारवर दररोज टीकेचा भडीमार होत आहे. अशा परिस्थितीत विविध राजकीय पक्षांकडूनही केंद्र सरकारवर आरोप केले जात असताना आता इंडियन मेडिकल असोसिएशननेही केंद्र सरकारवर गंभीर टीका केली आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले असल्याची ‘आयएमए’कडून टीका करण्यात आली आहे. ‘आयएमए’ने केंद्र सरकारच्या अपयशाची अनेक कारणेही सांगितली आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना त्यापासून बचाव करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून उपाय योजना करीत आहे. मात्र, आता केंद्र सरकार मात्र उपाययोजनामध्ये कमी पडल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. ‘आयएमए’ने टीकेत म्हंटल आहे की, कोरोनाच्या परिस्थितीवर उपाय आखताना तज्ज्ञांकडून सुचविलेले पर्याय, दिलेले सल्ले याकडे दुर्लक्ष करण्याचे काम केंद्र सरकारकडून केले जात आहे. तर कोरोनाची प्रत्यक्ष वस्तुस्थिती न पाहता सरकारकडून निर्णयही घेतले जात असल्याची गंभीर टीका आयएमएने केली आहे.

यापूर्वीही सम्पूर्ण देशभरात लॉकडाऊन लावावा असा सल्ला केंद्र सरकारला देण्यात आलेला होता. मात्र, केंद्र सरकारने टप्याटप्यानी लॉकडाऊन लावला. परिणामी देशात रुग्णसंख्या वाढतच गेली. सध्या विविध राज्यात लावलेला लॉकडाऊन व रात्रीच्यावेळी केलेली संचारबंदी हि पुरेशी वाट नाही.

राज्यातील जनतेला कोरोनाची लस लवकरात लवकर मिळावी म्हणून राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. अशात पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीन टप्प्यात लसीकरण्यात करण्यात येईल अशी घोषणा केली. मात्र, काही कालावधीनंतर लसींची टंचाई जाणवल्याने हि लसीकरण मोहीम बंद पडली. शिवाय दिल्या जात असलेल्या लसींचीही किंमत सरकारला निश्चित करता आली नाही. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. वास्तविक केंद्र सरकाने पोलिओ लसीकरणाचा आदर्श जर डोळ्यासमोर ठेवला असता तर हि वेळ आली नसती.

केंद्र सरकारच्या अपयशाचे महत्वाचे कारण म्हणजे ऑक्सिजनचा निर्माण झालेला तुटवडा होय. देशात सध्या काही प्रमाणात ऑक्सिजनचे उत्पादन केले जाते. अशा परिस्थितीत ऑक्सिजनच्या वितरणाबाबतही केंद्र सरकारने चलढकल, हलगर्जीपणा केला आहे. या कारणामुळे केंद्र सरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी झाल्याचे ‘आयएमए’ने सांगितले आहे.

Leave a Comment