नवी दिल्ली वृत्तसंस्था : सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अर्थात सीबीआयच्या संचालकपदी राज्याचे माजी पोलिस महासंचालक सुबोध जैस्वाल यांची नियुक्ती झाली आहे. सुबोध जैस्वाल यांनी सीबीआयची सूत्र हाती घेतल्यानंतर आता सीबीआय मध्ये नवा नियम लागू केला आहे. सीबीआयच्या कर्मचाऱ्यांनाही आता ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे.
सीबीआयच्या कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत या बाबतचे निर्देश सीबीआयचे संचालक सुबोध जैस्वाल यांनी जाहीर केले आहेत. त्यानुसार पुरुषांना जीन्स टी-शर्ट घालण्यास बंदी करण्यात आली असून महिलांनाही साडी व फॉर्मल कपड्यात येणं बंधनकारक करण्यात आले आहे.
सुबोध जैस्वाल यांनी सीबीआयची सूत्रे हाती घेतल्यानंतर आता ड्रेस कोड लागू केला आहे. त्यानुसार पुरुषांनी आता जीन्स टी-शर्ट चप्पल स्पोर्टशूज घालून ऑफिसला यायचं नाही असे नियम करण्यात आले आहेत. पुरुषांनी कॉलर शर्ट, फॉर्मल ट्राउझर्स, फॉर्मल शूज हा ड्रेस कोड बंधनकारक आहे. स्त्रियांकरिता साडी, शूज, फॉर्मल शर्ट आणि ट्राउझर्स असा ड्रेस कोड बंधनकारक करण्यात आला आहे. सीबीआयच्या कामांमध्ये व्यावसायिकता दिसावी आणि तिची प्रतिमा चांगली व्हावी यासाठी हा बदल केल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान यापूर्वी सीबीआय मध्ये ड्रेस कोड लागू झाला होता तेव्हा देखील महाराष्ट्र कॅडरचे एमजी कात्रे हे संचालक होते. एमजी कात्रे है सीबीआयचे 1985 ते 1989 या काळात संचालक होते.