औरंगाबाद | कधी नदीतून तर कधी जंगलातून आरोपी पळालेले आपण ऐकल असेल.मात्र औरंगाबादेत जुगारातील आरोपींना समोर दिसत असतानाही पोलिस त्यांना पकडू शकले नाहीत पहावं ते नवलच असा हा किस्सा सिटी चौक भागातील शहाबाजार स्मशानभूमी परिसरात घडला. आरोपी चक्क नाल्यात जाऊन बसल्याने ते समोर दिसत असूनही पोलिस त्यांना पकडू शकले नाहीत. काठावर उभे असलेले पोलीस त्यांना बाहेर येण्याची विनंती शिवाय काही करू शकले नाही.
पहा व्हिडिओ : https://twitter.com/Aishwar49917674/status/1402522432817139712?s=19
झाले असे की शहाबाजार स्मशानभूमीत काही जण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून उपनिरीक्षक मजबुरे हे पथकासह शहा बाजार स्मशानभूमी जाऊन त्यांनी छापा मारला. यावेळी पोलिसांनी इरफान शेख गफार अविनाश लांडगे चेतन देहाडे यांच्यासह मनपा सफाई कामगार असलेला संदीप दाभाडे या चौघांना जागेवरच पकडले तावडीतून दोन जण पळाले होते. पोलीस त्यांच्या पाठीमागे धावले पोलिसांच्या भीतीने पाहणाऱ्या जुगारऱ्यांनी थेट नाल्यात उड्या घेतल्या त्यामुळे पोलिसांचा नाईलाज झाला. समोर आरोपी दिसत असतानाही पोलिस त्यांना पकडू शकले नाहीत. आरोपी नाल्यात जाऊन गटारात बसले होते. पोलीस काठावरून त्यांना विनंती करीत होते मात्र आरोपी बाहेर आले नाही. त्यामुळे पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
पोलीस पाठलाग करीत असल्याने सैरभैर झालेल्या जुगारऱ्यांनी ज्या ठिकाणी नाल्यात उड्या घेतल्या त्या नाल्याच्या काठावर अनेक उंच इमारती आहेत. एका इमारतीच्या खिडकीतून हा व्हिडिओ बनविण्यात आला. सोमवारी बनवलेला हा व्हिडिओ मंगळवारी सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला त्यानंतर पोलिसांनी हा खुलासा केला.