नवी दिल्ली । बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात सीबीआय विशेष न्यायालयाने आज सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यावर एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आजचा दिवस देशासाठी काळा दिवस आहे. बाबरी मस्जिद सदर आरोपींनी पडली नाही तर मग काय जादूने मस्जिद पडली काय असा सवालही ओवेसी यांनी लगावला आहे.
बाबरी मस्जिद विद्वंसचे मूळ काँग्रेसमध्येच आहे. राजीव गांधी पंतप्रधान असतानाच बाबरी मस्जिद पाडण्यात आली. काँग्रेसच्या काळातच राम मंदिराचा शिलान्यास करण्यात आला. असं म्हणत ओवेसी यांनी यासर्व गोष्टींचे खापर भारतीय काँग्रेस पक्षावर फोडले आहे. भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांची यात्रा जिथे जिथे गेली तिथे तिथे जातीय दंगे झाले. एक घंटा और दो बाबरी मस्जिद तोड दो असं उमा भारतीने म्हटलं होत. मात्र तरीही ते आरोपी का नाहीत असाही ओवेसी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, तब्बल २८ वर्षानंतर बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात विशेष न्यायालयात आज निर्णय सुनावला. यावेळी सीबीआयच्या विशेष न्यायालयानं सर्व म्हणजेच ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निकाल दिलाय. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर फैजाबादमध्ये दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या.