हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोहम्मद अली जिना यांच्याप्रमाणेच AIMIM खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) हे भारताची दुसरी फाळणी करून देतील अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह (Giriraj यांनी ओवेसी यांच्यावर टीका केली आहे. ओवेसी नेहमीच कायद्याच्या विरोधात बोलतात आणि आपापल्या जाहीर सभेतून प्रक्षोभक वक्तव्य करतात असा आरोपही गिरीराज सिंह यांनी केला आहे. आता AIMIM कडून त्यांच्या या आरोपावर काय प्रत्युत्तर येते ते पाहायला हवं.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना गिरीराज सिंह म्हणाले, असदुद्दीन ओवेसी कायद्याच्या विरोधात बोलतात आणि प्रक्षोभक वक्तव्य करतात. जिना यांच्यानंतर ओवेसी भारताच्या दुसऱ्या फाळणीचे नेतृत्व करतील. भारताच्या फाळणीनंतर अनेक लोक पाकिस्तान आणि बांगलादेशात राहिले. दोन्ही देशांमध्ये त्यांच्यासोबत अनेक घटना घडल्या पण ओवेसी यांनी या गोष्टीचा कधी निषेध केला नाही. पाकिस्तान किंवा बांगलादेश असता तर ओवेसींचा आवाज आतापर्यंत दाबला गेला असता, असे गिरीराज म्हणाले.
Union Minister Giriraj Singh says, "Owaisi speaks against the law and he speaks instigating things. After Jinnah, he will lead the second partition…after partition, so many people were left in Pakistan and Bangladesh and so many incidents happened but he didn't say anything or… pic.twitter.com/4mmVCfcEzn
— ANI (@ANI) September 6, 2024
यापूर्वीही ओवैसींवर साधला होता निशाणा-
दरम्यान, गिरीराज सिंग यांनी यापूर्वी सुद्धा ओवैसी याना जिना म्हंटल होते. ओवेसी ज्या पद्धतीने भारत तोडण्याचे राजकारण करत आहेत, त्यामुळे ते भविष्यात देशाचे जिना बनतील. असुद्दीन ओवेसी यांच्या बोलण्यात आणि वागण्यात खूप फरक आहे. ज्याची मानसिकता ‘डोके आणि शरीर वेगळे करा’च्या घोषणांनी आहे, ओवैसी सतत भारताला तोडण्याचा प्रयत्न करत असून ते देशाची एकता आणि अखंडता कस टिकवणार? असा सवाल यापूर्वी गिरीराज सिंह यांनी केला होता.