आसाराम बापूला अंतरिम जामीन मंजूर; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

asaram bapu
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बलात्कारप्रकरणी स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापूला (Asaram Bapu) न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. परंतु आज सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) येत्या १५ मार्चपर्यंत आसाराम बापूचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अंतरीम जामीन काळामध्ये आसाराम बापूने आपल्या भक्तांना आणि अनुयायांना भेटू नये, पुराव्यांशी छेडछाड करु नये असे निर्देश दिले आहेत.

सध्या आसाराम बापू हा जोधपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये जन्‍मठेपेची शिक्षा भोगत आहे. आसाराम बापूवर आरोग्य मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. कारण की, मधल्या काळात हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे या जामिनाच्या काळात त्याच्या देखरेखीसाठी सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात यावे, असेही न्यायालयाने सांगितले आहे. तर आपल्या अनुयायांना भेटण्यास मनाई केली आहे.

दरम्यान, 2013 साली अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापूला जोधपूर न्यायालयाने 2018 मध्ये जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. तेव्हापासून आसाराम बापू कारागृहामध्ये शिक्षा भोगत आहे. या घडण्यामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. अल्पवयीन मुलीवर बलात्कार झालेले प्रकरण समोर आल्यानंतर अनेक महिलांनी आणि मुलींनी आसाराम बापू विरोधात तक्रार नोंदवली होती. इतकेच नव्हे तर, त्याच्या मुलाविरोधात देखील अनेक अत्याचार प्रकरण समोर आली होती. तर, आसाराम बापू यांच्या आश्रमात 2 मुलींची हत्या करण्यात आली असल्याचा देखील आरोप लावण्यात आला होता.