काँग्रेसची चाल हत्तीसारखी सरळ, ती उंटासारखी तिरकी नाही; अशोक चव्हाणांचा विलासरावांच्या ‘त्या’ व्हिडिओ द्वारे ममतांवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर थेट काँग्रेस आणि युपीए वर हल्लाबोल केला. युपीए वगैरे काही नाही अस म्हणत त्यांनी थेट काँग्रेसलाच फटकारले. यानंतर राज्यातील काँग्रेस नेते आक्रमक झाले असून याच पार्श्वभूमीवर मंत्री अशोक चव्हाण यांनी दिवंगत काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांचा एक जुना व्हिडिओ शेअर करत ममता बॅनर्जी यांच्यावर अप्रत्यक्षपणे पलटवार केला आहे.

“काँग्रेसची चाल बुद्धिबळातील हत्तीसारखी सरळ आणि थेट धडक देणारी आहे. काँग्रेस उंटासारखी तिरकी चालत नाही अन् घोड्यासारखी अडीच घरंही जात नाही.
अलीकडे काँग्रेसबाबत काही मंडळी़ंना झालेल्या गैरसमजाच्या पार्श्वभूमिवर स्व. विलासराव देशमुख यांच्या या विधानाची सहज आठवण झाली असे म्हणत त्यांनी विलासराव देशमुख यांचा व्हिडिओ शेअर केला.

दरम्यान, नाना पटोले यांनी देखील काँग्रेसच महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस हाच भाजपला सक्षम राजकीय पर्याय आहे, असे ते म्हणाले. भाजपच्या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी आणि राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहे. हे देशातील जनता पहात आहे. वैयक्तिक महात्वाकांक्षेपेक्षा देश महत्त्वाचा असून भाजपाविरोधातील लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढण्याची आवश्यकता आहे असेही ते म्हणाले.