हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द करण्याची घोषणा बुधवारी केली. यामुळे राज्यात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दरम्यान मराठा आरक्षण रद्द केल्याचा खापर आमदार विनायक मेटे यांनी आघाडी सरकारवर फोडले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून अशोक चव्हाण यांनी एक मिनिट सुद्धा पदावर राहू नये अशा कठोर शब्दात विनायक मेटे यांनी टीका केली आहे. बुधवारी विनायक मेटे बीड येथील जिजाऊ covid-19 केअर सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
अशोकराव चव्हाण याला सर्वस्वी जबाबदार
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की ‘अन्ना मध्ये मीठ कालवण्याचा प्रकार या सरकारने केला आहे. अशोकराव चव्हाण याचे सर्वस्व जबाबदार आहेत. म्हणून अशोकराव चव्हाण यांनी एक मिनिट सुद्धा या पदावर राहता कामा नये. 42 बलिदान देऊन करोडो लोकांनी रस्त्यावर येऊन जे मिळवलं ते यांनी मातीत घालवलं. सगळ्यांचे जीवन उध्वस्त करून हे मात्र मस्त एसी मध्ये बसून पैसे कमवायचे आणि बाकी सगळे गमवायचा मागे लागले आहेत. म्हणून मराठा समाजाचा तळतळाट यांना लागल्याशिवाय राहणार नाही. यामुळे अशोक चव्हाण यांनी एक मिनिट सुद्धा पदावर राहू नये अशा कठोर शब्दात विनायक मेटे यांनी टीका केली आहे.
पुन्हा एकदा आरक्षण लढा गरजेचा
राज्य सरकारच्या चुकीमुळे अपयश पदरी पडल्यामुळे मराठा समाजामध्ये संतापाची भावना आहे कोरोनाची परिस्थिती असताना मराठा समाजातील बांधवांनी नियम पाळून सरकारला त्यांची जागा दाखवून देणे गरजेचे भविष्यातील पिढी आणि मुलांच्या भवितव्यासाठी पुन्हा एकदा आरक्षण लढा गरजेचा आहे असे विनायक मेटे यांनी म्हटले आहे. दरम्यान मराठा समाजातील तरुणांनी हे आंदोलन हातामध्ये घेतले पाहिजे असे आवाहन देखील मेटे यांनी सार्वजनिक कार्यक्रमातून मराठा समाजातील तरुणांना केला आहे यामुळे मराठा आरक्षणासाठी चा आंदोलन उग्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आघाडी सरकाराच्या मुर्खपणामुळे आरक्षण रद्द
मराठा आरक्षण रद्द च्या बाबत प्रतिक्रिया देताना विनायक मेटे यांनी म्हटलं की,’ जे आरक्षण देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांच्या प्रयत्नांमुळे मिळालं होतं ते आघाडी सरकारच्या मूर्खपणामुळे नालायक पणामुळे आणि या सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये योग्य पासून न मांडल्यामुळे रद्द झाले. हा मराठा समाजा साठी काळा दिवस आहे. असा घणाघात आमदार विनायक मेटे यांनी केला आहे.