कॅप्टन रणगाडे अशोक सराफ झळकणार Man vs Wild मध्ये? Bear Grylls सोबतचा व्हिडीओ व्हायरल

0
218
Ashok Saraf In Man Vs Wild
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचा सर्व्हायवर शो Man vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला आजपर्यंत अनेक स्टंट करताना, वेगवेगळ्या जीवांना बेफिकीरिने खाताना आपण पाहिलं असेल. बेअर ग्रिल्स हा अत्यंत निर्भीाड आणि साहसी असून त्याने आतापर्यंत अनेक जंगलं आणि पर्वतांवर अॅडव्हेंचर ट्रीप केल्या. मात्र, आता त्याच्यासोबत मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेते (कॅप्टन बाजीराव रणगाडे) अशोक सराफ झळकणार आहेत. कॉमेडी किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक मामांचा एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे.

मराठी अभिनेते अशोक सराफ यांचा सहभाग असलेला नुकताच एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला असून या व्हिडीओमध्ये अशोक सराफ चक्क Man vs Wild फेम Bear Grylls सोबत जंगलात फिरताना दिसत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओत Bear Grylls मॅन वर्सेस वाईल्डच्या नव्या एपिसोडसाठी भारतात आला आहे. आणि या ठिकाणी तो चक्क अशोक सराफ उर्फ कॅप्टन बाजीराव रणगाडे यांच्या सोबत जंगल सफारी करताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/ClvZcWiAcmV/

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ खरा नसून अशोक सराफ यांनी ‘माझा पती करोडपती’ या चित्रपटात साकारलेली कॅप्टन रनगाडे ही व्यक्तीरेखा एडिट करून Bear Grylls सोबत दाखवण्यात आली आहे. हा व्हिडीओ म्हणजे एक प्रकारचं मीम्स आहे. केवळ गंमत म्हणून हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे.