#गणेशोउत्सव२०१९ | अष्टविनायक गणपतींपैकी एक गणपती म्हणजे सिद्धटेकचा सिद्धिविनायक. ह्या गणपतीचे मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा या गावापासून ४८ कि. मी अंतरावर पुणे-सोलापूर महामार्गावर स्थित आहे.
सिद्धिविनायकाची मूर्ती आणि मंदिर परिसर
सिद्धिविनायकाच्या मंदिरातील मूर्ती ही स्वयंभू मूर्ती असून ती ३ फूट उंच आहे. ही मूर्ती उत्तराभिमुख असून या गणपतीची सोंड उजवी आहे. अष्टविनायक पैकी हा असा एकमेव गणपती आहे ज्याची सोंड उजवी आहे. हि स्वयंभू मूर्ती एका पितळेच्या चौकटीत स्थित आहे. या गणपतीच्या या मांडीवर रिद्धी- सिद्धी बसलेल्या आहेत. गणपतीच्या दोन्ही बाजूला जय-विजय यांच्या पितळेच्या मूर्ती स्थित आहेत. या मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग ५ कि. मी मोठा आहे. कारण ही मूर्ती डोंगराला जोडली गेली आहे. एका प्रदक्षिणेला जवळपास अर्धा तास इतका वेळ लागतो. या गणपतीच्या प्रभावळीवर चंद्र, सूर्य, गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे. नंतरच्या काळात पेशवेकालीन महत्व लाभलेल्या ह्या सिद्धिविनायकच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला आहे.
सिद्धिविनाक कथा
एका आख्यायिकेनुसार जेव्हा ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करीत होते तेव्हा भगवान विष्णू हे निद्राधीन झाले. विष्णूचा कामातून मधू आणि कैतभ हे दैत्य निर्माण झाले . या दैत्यांनी देवी देवतांना त्रास द्यायला सुरुवात केली. पण केवळ विष्णूच या दैत्यांचा नाश करू शकत होते. परंतु विष्णू देखील प्रयत्न करूनही या दैत्यांना मारू शकले नाही. तेव्हा त्यांनी युद्ध थांबवले आणि गंधर्वाचे रूप धारण करून गायन सुरु केले.
भगवान शंकरानी हे गायन ऐकले आणि त्यांनी या संकटावर मत करण्यासाठी ‘ओम गणेशाय नमः’असा जप विष्णूंना असा जप करायला सांगितला. हा जप करण्यासाठी विष्णूंनी सिद्धटेक या ठिकाणाची निवड केली. याच डोंगरावर विष्णूंनी चार दरवाजे असलेले मंदिर स्थापन उभे करून गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली. गणपतीची अर्धन केल्यामुळे विष्णूला सिद्ध प्राप्त झाल्याने त्यांनी मधू- कैतभ दैत्यांचा संहार केला. कालांतराने विष्णूंनी उभारलेले मंदिर नष्ट पावले.
दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार एका गुराख्याने येथे गणपतीला पहिले आणि तो गणपतीचे पूजन करू लागला. नंतर इथे पूजा-अर्चा करण्यासाठी त्याला एक पुरोहित मिळाला. अखेरीस पेशव्यांच्या राज्यात इथे पुन्हा मंदिर उभारले. असेही सांगितले जाते कि, छोट्याशा टेकडीवर असलेल्या या मंदिराचा रास्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला तसेच १५ फूट उंचीचे आणि १० फूट लांबीचे सध्याचे मंदिर अहिल्याबाई होळकर यांनी बांधले आहे.